कोल्हापूरात राष्ट्रवादीनंतर काँग्रेसलाही मोठा धक्का

कोल्हापूर | महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार, खासदार आणि मंत्र्यांसह कार्यकर्ते शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेसला धक्का बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये खळबळ माजली आहे.

काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पक्षाकडून दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप केला आहे. तसेच जिल्हाध्यक्षपदा सह पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

प्रकाश आवाडेंकडे 6 महिन्यांपूर्वीच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी पक्षाच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून लढण्याचे किंवा शिवसेनेत प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या-