मुंबई | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (16 एप्रिल) जाहीर होणार आहे.
आज याठिकाणी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी घेणाऱ्या काँग्रेसचं मताधिक्य हळूहळू कमी होताना दिसत आहे.
सातव्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव साडे नऊ हजारपेक्षा अधिक मतांना आघाडीवर होत्या. आता त्यांचं मताधिक्य 8 हजारांवर आलं आहे.
मतमोजणीच्या तीन फेऱ्यांमध्ये भाजप उमेदवार सत्यजित कदम पुढे आहेत. आठव्या, नवव्या, फेरीत कदम यांना जाधवांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत.
आठव्या फेरीपासून कदम यांना जाधव यांच्यापेक्षा जास्त मतं मिळताना दिसत आहेत. सातव्या फेरीत जाधव यांना 1200 मतं अधिक होती. त्यांच्याकडे एकूण 9 हजार 675ृ6 मतांची आघाडी होती.
आठव्या फेरीत कदम यांनी ही आघाडी 524 मतांनी कमी केली. नवव्या फेरीतही कदम यांना अधिक मतं मिळाली. त्यामुळे जाधव यांचं मताधिक्य 9 हजारांच्या खाली आलं.
दहाव्या फेरीत कदम यांना 3 हजार 794 मतं मिळाली, तर जाधव यांना 2 हजार 868 मतं मिळाली. त्यामुळे जाधव यांचं मताधिक्य 8 हजार 73 वर आलं आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास उत्तर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का बसू शकतो.
राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती निकालाची. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या निवडणुकीत जोरदारपणे उतरले.
महत्त्वाच्या बातम्या-
“मी मुंबई, महाराष्ट्राची मुलगी, ज्याच्यामध्ये हिम्मत असेल त्यांनी…”
Kolhapur Election Result 2022 | करुणा शर्मांचा भाजप अन् काँग्रेसवर गंभीर आरोप, केली ‘ही’ मागणी
उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल; जयश्री जाधव आघाडीवर
“हम तो डुबेंगे सनम, तुमको भी ले डुबेंगे”
नवरा जेलमध्ये, पत्नीला हवंय मूल; न्यायालयानं दिला मोठा निर्णय