Top news महाराष्ट्र सातारा

Maharashtra Kesari 2022: कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी

Prithviraj Patil e1649517029539
Photo Credit - Twitter/ @mohol_murlidhar

सातारा | महाराष्ट्र केसरी कुस्तीचा अंतिम सामना (Maharashtra Kesari 2022 final match) हा कोल्हापूर विरुद्ध मुंबई पार पडला. कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील (Prithviraj Patil ) यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.

कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि मुंबईचा विशाल बनकर यांच्यात अंतिम लढत झाली. या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या विशाल बनकरचा पराभव केला आहे.

सहा मिनिटांच्या या लढतीत पृथ्वीराज पाटील याने बाजी मारत 5-4 नं मात केली आहे. जवळपास 21 वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळाली आहे. त्यामुळे सध्या कोल्हापूरात जल्लोषाचं वातावरण आहे.

कोरोना महासाथीच्या रोगामुळे गेल्या दोन वर्षापासून या स्पर्धा पार पडल्या नव्हत्या. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेकडे सगळ्यांच्या नजरा लागून होत्या. आता निर्बंधमुक्तीनंतर जनजीवन रुळावर येत असून ही स्पर्धाही साताऱ्यात उत्साहात पार पडली.

महाराष्ट्र केसरी हा राज्यातील सर्वोच्च कुस्ती किताब पटकावल्याबद्दल कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अनेक मल्लांनी या स्पर्धेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपलं आणि राज्याचं नाव गाजवलं आहे.

पृथ्वीराज पाटील 95 किलो वजनी गटात ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी ठरला. पृथ्वीराज पाटील आर्मीत हवालदार पदावर कार्यरत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  Gold Rate : सोन्याच्या दरात ‘इतक्या’ रुपयांची वाढ, वाचा ताजे दर

  उद्यापासून कोरोनाच्या Booster डोसला सुरुवात, केंद्रानं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

  “शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे संजय राऊतांचा हात”

  आताची सर्वात मोठी बातमी! गुणरत्न सदावर्तेंना ‘इतक्या’ दिवसांची पोलीस कोठडी

  धक्कादायक! ‘या’ भागात आढळला कोरोनाच्या XE व्हेरियंटचा रुग्ण