“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”

रायगड | चक्रीवादळग्रस्तांना 9 दिवसात कोणतीही मदत मिळालेली नाही, जिथे नुकसानग्रस्तांना ठेवलंय, त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अनेकांचे हाल होत आहेत, सर्वात आधी त्यांची राहण्याची योग्य सोय करावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी चक्रीवादळाने नुकसान झालेल्या कोकणची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. नुकसानग्रस्तांना जिथं जिथं ठेवलं आहे त्याची अवस्था खुराड्यासारखी आहे. अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवण्यात आलं आहे. त्यांना आधी योग्य ठिकाणी ठेवलं पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

सरकारने हेक्टरी 50 हजाराची मदत घोषित केली आहे. मात्र हे नुकसान वेगळं आहे. पिकांच्या बाबतीत ही मदत ठिक आहे, पण कोकणात पुढील अनेक वर्षे उत्पन्न देणारी झाडं पडली आहेत. जी उभी आहेत त्या झाडांची अवस्था देखील वाईट आहे, असं फडणवीसांनी सांगितलंय.

आम्ही आमच्यावेळी केंद्र आणि एनडीआरएफची एकत्रित रक्कम देऊन अडीच लाख रुपयांपर्यंतची मदत देऊ केली होती. आत्ता लोकांना घरावर छतं लावायची आहेत त्याचा काळाबाजार सुरु झाला आहे. सरकारने काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. सरकारने या गोष्टी कमी किमतीत उपलब्ध करुन द्याव्यात, असं फडणवीस यांनी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-भारतात या 8 औषधांच्या वापराने बरे झालेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

-शरद पवारांचा ‘तो’ दावा विनोद तावडेंनी खोडून काढला, म्हणाले…

-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीच्या ऑफरवर राजू शेट्टी म्हणाले…

-“देशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पंतप्रधान मोदीच जबाबदार”

-नाभिक आणि धोबी व्यावसायिकांसाठी नाना पटोलेंची मुख्यमंत्र्यांकडे विशेष मागणी