मुंबई | कोरोना व्हायरसने अर्थव्यवस्था पोखरायला सुरूवात केलीये. जगभरातल्या शेअर बाजाराप्रमाणे मुंबईचा शेअर बाजारदेखील कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. आज शेअर बाजार बंद होत असताना सेन्सेक्स 1448 अंकांनी कोसळला आहे. यामुळे अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांचे साडे पाच लाख कोटी बुडाले आहेत तर गेल्या 6 दिवसांत गुंतवणूकदारांच्या 10 लाख कोटींना चुना लागला आहे.
जगात दुसऱ्या क्रमांकांची चीनची अर्थव्यवस्था कोलमडल्याने गुंतवणूकीसाठी सोन्याला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सोन्याचे दर 46 हजारांच्या घरात पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे ऐन लग्नसराईत सोनं भाव खाण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये.
अमेरिका, जपान, सोऊथ कोरिया या शेअर बाजारांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. डाऊ तसंच जपानचं मार्केट असलेलं निक्की जवळपास गेल्या 12 तासांत अडीच टक्क्यांनी घसरलेलं पाहायला मिळालं. ही सगळी शेअर बाजारात उलथापालथ व्हायला कोरोनाचं थैमान प्रमुख कारण मानलं जात आहे.
जुलै महिन्यात जपानमध्ये ऑलंम्पिक आहे. त्या ऑलंम्पिकच्या स्पर्धा रद्द होतील की काय? या भीतीने तेथील शेअर बाजार अडीच ते तीन टक्क्यांनी घसरलेला दिसून आला. ऑस्ट्रेलिया तसंच दक्षिण कोरिया या देशांमध्ये देखील कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे. दिवसेंदिवस या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. यामुळे तिथे देखील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे.
आज या सगळ्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसून आला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील अडीच ते तीन टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. भारतीय बाजारमध्ये मेटल, ऑटो सेक्टर, आयटी, ऑईल, गॅस, तसंच सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका यांना मोठा फटका बसलेला आहे. याचमुळे आज दिवसभरात गुंतवणूकदारांचे साडे पाच लाख कोटी बुडाले आहेत. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येतीये.
महत्त्वाच्या बातम्या-
-महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी तुमचा आवडता खासदार कोण? सुप्रिया सुळेंचं लक्षवेधी उत्तर
-मुस्लिम आरक्षणासाठी लवकरच कायदा करणार- नवाब मलिक
-5 हजार वर्षात कोणत्याही हिंदू राजाने मशीद पाडली नाही- नितीन गडकरी
-…म्हणून राज्य सरकार 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करणार!
-ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी म्हणणाऱ्या भुजबळांना फडणवीसांचं उत्तर