मुंबई | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.
आजच्या महिला पुढारलेल्या आहेत पण नवाब मलिक बायकांच्या चोमडेपणासारखे आरोप करतायेत, अशा शब्दात क्रांती रेडकर यांनी नवबा मलिक यांना सुनावलं आहे.
समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत. ते फक्त दोन-तीन टक्के आहेत. इतर अनेक गँगस्टर, ड्रग्स पेडलरलाही त्यांनी पकडलं आहे. ते कोणत्या पक्षासाठी काम करत नाहीत, ते न्यूट्रल आहेत, असं मत क्रांती रेडकर यांनी व्यक्त केलंय.
समीर वानखेडे यांना आणि त्यांच्या परिवारातील सदस्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. लटकवू, जाळून टाकू, मारुन टाकू, अशा शब्दात आम्हाला धमक्या येत असल्याचा गंभीर आरोपही क्रांती रेडकर यांनी केला आहे.
वानखेडे या प्रकरणातून बाहेर पडणारच. शेवटी सत्याचाच विजय होणार आहे. वेळच नवाब मलिकांना उत्तर देईल. अजूनही कटकारस्थान केले जातील. अनेक कागदपत्रं तयार केली जातील. त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला जाईल. पण ती गोष्ट सिद्ध करणं सर्वात मोठी गोष्ट आहे. ते हे लोकं सिद्धच करू शकणार नाही. कारण हे सर्व खोटं आहे, असं क्रांती रेडकर यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
“भाजपचा जन्म पवित्र झग्यातून झाला नाही, तुमच्याच अंगावर तुमचंच प्रकरण उलटलंय”
नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर लेटर बॉम्ब; केला मोठा गौप्यस्फोट
दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली ‘ही’ भेट!
येत्या महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का?; जयंत पाटलांच मोठं वक्तव्य म्हणाले…
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये मोठा बदल, वाचा आजचा दर