Top news महाराष्ट्र मुंबई

माझा उद्धव ठाकरेंवर पूर्ण विश्वास, ते सत्याचीच बाजू घेतील- क्रांती रेडकर

मुंबई | अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांना समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. क्रांती रेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.

माझा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे. ठाकरे कुटुंबीय आणि महाराष्ट्र सरकारवरही माझा पूर्ण विश्वास आहे. काहीह झालं तरी सत्य समोर येणार आहे. त्यावेळी आपले मुख्यमंत्री सत्याचीच बाजू घेतील, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.

क्रांती यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे खोटे असून त्यात काहीच तथ्य नाही. आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना आमच्या शुभेच्छा आहेत, असंही क्रांती रेडकर यांनी म्हटलंय.

मीडिया ट्रायल करुन आरोप सिद्ध होत नाहीत. त्यांच्याकडे पुरावे आहेत तर मग ते ट्विटरवर का पोस्ट करतात? त्यांनी कोर्टात जावं, असं क्रांती रेडकर म्हणाल्या. यासोबत हे संपूर्ण प्रकरण सुरू झाल्यापासून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचाही खुलासा त्यांनी केला आहे.

नवाब मलिक असं का वागतायेत ते मला कळत नाहीये. नवाब मलिक वैयक्तिक अजेंडा घेऊन विरोध करत असतील. यामागे अनेक कारणं असू शकतात, असं क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“संजय राऊत इंटरव्हलनंतर बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार”

“आजच्या महिला पुढारलेल्या पण नवाब मलिकांचे आरोप बायकांच्या चोमडेपणासारखे”

“भाजपचा जन्म पवित्र झग्यातून झाला नाही, तुमच्याच अंगावर तुमचंच प्रकरण उलटलंय”

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंवर लेटर बॉम्ब; केला मोठा गौप्यस्फोट

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना सरकारने दिली ‘ही’ भेट!