“माझी 99 टक्के संपत्ती वडिलोपार्जित, ती राज्य सरकारकडे जाहीरही केलीये”

पुणे | IPS पोलिस अधिकारी कृष्ण प्रकाश (IPS Krishna Prakash) हे चांगलेच गोत्यात आलेत. त्यांच्या प्रतिमेला तडा जाणारं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त त्यांनी दीड वर्षांच्या कालावधीत वादग्रस्त जमिनींच्या खरेदी-विक्रीतून दोनशे कोटी रुपयांची कमाई केल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडालीये.

पत्रातून कृष्णप्रकाश यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेत. यानंतर कृष्णप्रकाश यांची संपत्ती नेमकी किती असा सवाल विचारला जात आहे. अशात त्यांच्या संपत्तीबाबत महत्त्वाची माहिती समोर आलीये.

महाराष्ट्रात सेवेत असणारे कृष्णप्रकाश यांनी राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता घेतली आहे. मुंबई, औरंगाबाद, पुणे, पिंपरी चिंचवड, अहमदनगर, देहूगाव, बाणेर, कुपवाड या ठिकाणी त्यांची जमीन आणि प्लाॅट्स आहेत. तसेच झारखंड, हजारीबाग येथे त्यांच्या जमीनी, फ्लॅट्स आहेत.

दरम्यान, 99 टक्के संपत्ती वडिलोपार्जित असून केवळ 1 टक्का महाराष्ट्रातील मालमत्ता ही गेल्या 24 वर्षाच्या सेवाकाळात घेतल्याचे कृष्णप्रकाश यांनी सांगितले. ती संपत्ती छुपी नसून राज्य सरकारकडे जाहीर केली असल्याचं म्हटलंय. तसेच ती चुकीच्या मार्गाने घेतली नसून ज्ञात स्त्रोत आणि कर्जातून खरेदी केली असल्याचं कृष्णप्रकाश यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

कृष्णप्रकाश यांची संपत्ती किती?, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर  

 ‘त्या’ लेटरबॉम्बवर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

‘धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं’; दिग्गज नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

 ‘सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा’; भुजबळांचा टोला नेमका कुणाला?

 “14 तारखेला अनेकांचा…”; ठाकरेंचा ठाकरे शैलीत विरोधकांना इशारा