‘त्या’ लेटरबॉम्बवर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे | पोलीस दलातील आणखी एका लेटर बॉम्बमुळे खळबळ उडाली आहे. पिपंरी-चिंचवडमध्ये माजी आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र समोर आलं आहे.

पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त कृष्णप्रकाश (IPS Krishna Prakash) यांच्यासाठी जमीन व्यवहारातून तब्बल 200 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा दावा या बनावट पत्रात करण्यात आला आहे.

कृष्णप्रकाश यांच्या काळात त्यांचे रीडर आणि सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत असणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक डोंगरे यांच्या नावे मुख्यमंत्र्यांना पाठवलेले हे सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

या कथित पत्रानुसार डोंगरे यांनी जीवाला धोका असल्याचा दावा करत कृष्णप्रकाश यांच्या जमिनीच्या व्यवहाराचे पैसे गोळा करावे लागत असल्याचा दावा केला आहे.

ही रक्कम 200 कोटींची असल्याचा दावा या कथित बनावट पत्रात करण्यात आला आहे. इतकंच नाही तर अनेक पत्रकारांना ही कृष्णप्रकाश यांनी पैसे पुरवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या आरोपांवर कृष्ण प्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कृष्णप्रकाश यांनी हे पत्र केवळ बदनामीसाठी व्हायरल केल्याचं स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘धनंजय मुंडेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं’; दिग्गज नेत्याच्या वक्तव्याने चर्चांना उधाण 

 ‘सहकाऱ्यांना सोडून पळणारा मुख्यमंत्री नसावा’; भुजबळांचा टोला नेमका कुणाला?

 “14 तारखेला अनेकांचा…”; ठाकरेंचा ठाकरे शैलीत विरोधकांना इशारा

 “आघाडी सरकारचा बुरखा टराटरा फाडणार” चंद्रकांत पाटील भडकले

सत्ता जाताच मागं लागली साडेसाती! इमरान खान यांच्या अडचणीत वाढ