नवी दिल्ली | टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाची अत्यंत सुमार कामगिरी सुरु आहे, मात्र अफगानिस्तानविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघाने इज्जत राखण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच झालेल्या एका आरोपांनी भारतीय टीम पुन्हा चर्चेत आली आहे.
टीम इंडियाची या विश्वचषकातील कामगिरी निराशाजनक कामगिरी पाहता सर्व स्तरातून संघ आणि संघ व्यवस्थापनावर सडकून टीका होताना दिसत आहे. आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर झालेल्या टीकेनं खळबळ उडाली आहे.
अभिनेता कमाल राशिद खान म्हणजेच केआरकेने मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर निशाणा साधला आहे. शास्त्री 24 तास नशेच्या धुंदीत असतात असा गंभीर आरोप कमाल आर खानने केला आहे.
केआरकेने आपल्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्याने न्यूझीलंडविरोधात झालेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचे विश्लेषण करत कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक शास्त्रींना लक्ष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाला केआरके?
“रवी शास्त्री २४ तास नशेच्या धुंदीत असतात. एखाद्या लहान मुलाने त्यांचा चेहरा पाहिला तर तो चार दिवस रडत राहील. जेव्हा विराट कोहलीने न्यूझीलंडविरोधातील सामन्यात पहिलं षटक कोणाला द्यावे असे विचारले असेल तेव्हा नशेच्या धुंदीतच त्यांनी विराटला वरुन चक्रवर्तीला पहिले षटक टाकायला सांग असे सांगितले असेल,” असं केआरकेने म्हटलं आहे.
दुसरीकडे केआरकेने वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेवरुनही टीम इंडियावर निशाणा साधला आहे. नाणेफेक हरल्यानंतर कोहली घाबरला, त्याच्या भीतीचा काही ठाव ठिकाणा नव्हता. कोहलीने तेव्हाच मान्य केलं की आपण हा सामना १०० टक्के गमावणार आहोत, असा आरोपही केआरकेनं केलाय.
रोहित शर्माच्या आधी ईशान किशनला सलामीला पाठवण्याचा भारतीय संघाचा निर्णयही चांगलाच चुकला. तो मुलगा कधी कधी आयपीएलमध्ये धावा करतो, पण आंतरराष्ट्रीय सामने खेळणे आणि आयपीएल खेळणे या दोन वेगवेगळ्या आहेत, असंही केआरकेनं म्हटलं आहे.
रवी शास्त्रींवर आधीच बेवडे असल्याची टीका होत असते. त्यांच्यावर अनेक मिम्सही याआधी बनलेले आहेत. मात्र केआरकेच्या आरोपींनी नक्कीच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, भारताचा आधी पाकिस्तानने दारुण पराभव केला आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात देखील भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं. त्यामुळे भारतीय खेळाडूंवर जोरदार टीका होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोदी सरकारकडून दिवाळी भेट! पेट्रोल आणि डिझेल ‘इतक्या’ रूपयांनी स्वस्त
”The Lalit’ में राज छुपे है’; नवाब मलिकांकडून भाजपला खास दिवाळी शुभेच्छा
“चला आव्हान स्वीकारलं, आता होऊन जाऊ दे दूध का दूध और पानी का पानी”