मुंबई | आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली आहे. आता तुम्हाला देश सोडून पळून जावं लागेल, असं वक्तव्य अभिनेता कमाल आर खानने केलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.
मुस्लिमांनी काँग्रेसला मतदान करून चूक केली. आता त्याला देश सोडून पळून जावं लागणार आहे. केआरकेच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
वाराणसीतील मुस्लिम खूप मूर्ख आहेत जे ज्ञानवापी मशिदीसाठी लढत आहेत. सरकार आपलं आहे, पोलीस आपले आहेत, न्यायालय देखील आपलं आहे हे त्यांना का समजत नाही? त्यामुळे तो त्याला हवं ते करू शकतो, असंही त्याने याआधी म्हटलं आहे.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता कमाल आर खान हा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. केआरके सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसतं.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केआरके कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीला ट्रोल करताना दिसतो.
महत्त्वाच्या बातम्या-
“पवारांनो वेळीच सुधारा, अन्यथा तुमची अवस्था श्रीलंकेसारखी होईल”
“इकडे मशिदी खोदण्यापेक्षा, चीनच्या ताब्यातील कैलास मानसरोवर मिळवून दाखवा”
“कुठेही दगड ठेवा अन् त्याला लाल रंग लावा, लगेच मंदिर तयार होतं”
“निवडून यायचं एकाच्या जीवावर अन् चाकरी दुसऱ्यांची करायची”
गुजरातमध्ये काँग्रेसला जोर का झटका; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा