मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत नेहमीच भाजप नेत्यांवर टीका करताना दिसतात. याला आज भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी प्रत्युत्तर देत राऊतांवर टीकास्त्र सोडलं आहे.
कृपाशंकर सिंह यांच्या मुंबईतील घरी आज होळीचा उत्साह पाहायला मिळाला. आपल्या कार्यकर्त्यांसोबत, तसेच आप्तस्वकीयांसोबत होळी खेळल्यानंतर माध्यमांशी बोलकाना कृपाशंकर सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना संजय राऊतांकडून भाजपवर सातत्याने टीका केली जात असल्याबाबत विचारणा केली असता त्यांनी राऊतांवर सडकून टीका केली.
असं म्हणतात वृंदावन मे आना है, तौ राधे राधे कहना है… पण संजय राऊतांचं असं आहे की ‘दिन में बोले जय श्री राम, और रात को लेते सौ सौ ग्राम.. जोगिरा सारारारा, असं कृपाशंकर सिंह यांनी म्हटलं.
होळीच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ते वारंवार म्हणत असतात शिवसेनेचे लोक अयोध्येला कारसेवेसाठी गेले, मंदिर बनवण्यासाठी गेले, आम्ही हिंदुत्वाचं पालन करू, आम्ही हिंदू आहोत वगैरे. ते वारंवार हे बोलत आहेत. पण त्यांना दोन पक्षांच्या सरकारसोबत वाटचाल करायीच आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
यानंतर राऊत आमचे चांगले मित्र असून त्यांची भेट घेऊन काही विषयांवर चर्चा करायची आहे, असंही कृपाशंकर सिंह म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! युद्ध संपवण्यासाठी पुतिन यांनी केल्या ‘या’ मागण्या
“तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखं वागतायेत”
“देश सध्या चारच लोक चालवत आहेत, दोघं विकतात तर 2 जण खरेदी करतात”
भाजपला पराभूत करण्यासाठी एमआयएमचा मोठा डाव, आता…
“पावसात भिजून देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त 54 आमदार निवडून आले”