पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak) यांनी बांधली, मग टिळकांनाही तुम्ही ब्राह्मण म्हणूनच बघणार का?, असा सवाल केला होता.
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून आता राजकारण तापलंय. यावर टिळकांचे पणतू कुणाल टिळक यांनी भाष्य केलंय.
लोकमान्य टिळक यांनी काही फंड जमा केला होता. हा फंड त्यांनी डेक्कन बँकेत जमा केला होता. त्याचे पुरावेही त्यांनी केसरीमध्ये सन 1899 साली दिलेले होते. त्यानंतर डेक्कन बँक दिवाळखोरीत गेली, असं ते म्हणालेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असा टिळक कुटुंबीयांचा दावा नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
आपण संपूर्ण अभ्यास करूनच आपली मते मांडली पाहिजेत एवढीच माझी विनंती आहे, असं कुणाल टिळक म्हणालेत.
समाधीसाठी टिळकांनी 20 हजारांचा निधी जमा केला होता, असं कुणाल टिळक यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पहिल्याच नजरेत पडाल प्रेमात; Hyundai ची शानदार कार लवकरच येणार बाजारात
काँग्रेसला सर्वात मोठा झटका, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर
भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांची सर्वात मोठी कारवाई!
“देवेंद्र फडणवीस मिस्टर इंडिया बनून बाबरीच्या ढांच्यावर हातोडा मारत होते का?”
“संसार उभारण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस घालण्यासाठी अक्कल लागत नाही”