नातवाच्या राजकीय एन्ट्रीने आजीच्या आनंदाला उधाण!

मुंबई |  राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे यांनी आज मनसेच्या मुंबईच्या गोरेगावच्या अधिवेशनात अधिकृतपणे राजकारणात दिमाखदार एन्ट्री घेतली आहे. यावेळी कार्यक्रमस्थळी त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित उपस्थित होतं. अमित यांच्या आजी आणि राज यांच्या मातोश्री कुंदा ठाकरे यांना अमितच्या राजकारण्यात येण्याने आनंदाला पारावर उरला नव्हता.

मला खूप चांगलं वाटतंय की आज अमित राजकारणात पाऊल ठेवतोय. अमित नक्कीच खूप चांगलं काम करेल आणि खूप मोठा होईल, अशा भावना अमितप्रती कुंदा ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केल्या.

दुधापेक्षा साय घट्ट असते. अमित पुढे जाऊन महाराष्ट्राच्या भल्यासाठी खूप चांगलं काम करेल, अशी आशा कुंदा ठाकरे यांनी व्यक्त केली. माझअया सासुबाईंची आजच्या राजकीय कार्यक्रमाला उपस्थिती आणि अमितला दिलेला आशीर्वाद हा आमच्यासाठी स्पेशल आहे, असं राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

अमित फक्त एक प्रस्ताव वाचून दाखवेल, असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. आज पहिल्यांदाच तो मंचावर जाणार होता. त्याला ऐकण्याची आम्हाला खूप उत्सुकता होती, असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या-