“खोट्या बातम्या पसरवणारे राहुल गांधी आणि सोनिया गांधींनी चीनकडून पैसे घेतले आहेत”

नवी दिल्ली | कोरोनाकाळात देशातील राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या खेळी चालूच आहेत. गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. मात्र, आता चीनच्या मुद्द्यावरून भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोनिया आणि राहुल गांधी या दोघांनी राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करत चीनकडून पैसे घेतले आहेत. राष्ट्रीय हित सोडून यापेक्षा कोणी खालच्या पातळीवर जावू शकतं का, अशा शब्दात नड्डा यांनी ट्वीटरच्या माध्यमातून गांधी कुटुंबियांवर टीका केली आहे.

संपूर्ण देश सध्या कोरोनाशी दोन हात करत आहे. अशा परस्थितीमध्ये राहुल गांधी मात्र फेक न्यूज पसरवण्याचं काम करत आहेत. राहुल गांधींच संपूर्ण करीअरच खोट्या बातम्या पसरवण्यात गेलं आहे, अशा शब्दात जे.पी.नड्डा यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

दरम्यान, अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट’ या वृत्तपत्राचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर भाजपचं नियंत्रण असल्याची गंभीर टीका केली होती. राहुल गांधी यांच्या या टीकेमुळे राजकारण चांगलंच तापल आहे. राहुल गांधींच्या याच आरोपावर प्रत्यारोप करताना जे.पी.नड्डा यांनी हे ट्वीट केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य राहिलेले सुधाकरपंत परिचारक यांचं कोरोनामुळे निधन

“तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय”

“सुशांत कधीच आपल्या बेडरूमचा दरवाजा बंद करत नव्हता… सुशांतला त्याच्या स्टाफनेच मारलं”

राज ठाकरेंनी सुनील ईरावरांच्या कुटुंबियांसोबत फोनवरुन साधला संवाद, वाचा काय म्हणाले राज ठाकरे…

“संघर्षाची भीती मला कधी वाटली नाही… तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर त्याचा मला जास्त त्रास होईल