महाराष्ट्र मुंबई

80 वर्षीय वडिलांना खांद्यावर घेऊन मजुराचा मुलुंड ते वाशिम 350 किमी पायी प्रवास


मुंबई | देशभरात लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी मजूर अडकले आहेत. हालअपेष्टा होत असल्याने अनेक मजूर लॉकडाऊन उठण्याची वाट न पाहता पायीच आपल्या गावाकडे निघाले आहेत.

वाशिम येथील एका बांधकाम मजूराने 80 वर्षांच्या आपल्या वडिलांना खांद्यावर घेत तब्बल 350 किलोमीटरचा पायी प्रवास केल्याचं समोर आलं आहे. वडिलांना चालता येत नाही आणि मुंबईत राहूही शकत नाही, अशा स्थितीत या लेकाने वडिलांना मागे न ठेवता आपल्यासोबत गावाकडे प्रवास केला.

आणीबाणीच्या या काळात त्याने वडिलांना आपल्यावरील बोजा न समजता जबाबदारी समजलं आणि मुंबईत वडिलांना सोडून न जाता आपल्यासोबत गावी नेण्याचा निर्णय घेतला. ज्ञानेश्वर शिंदे असं या मजूराचं नाव आहे. सोबत वडील यशवंत शिंदे हेही होते.

यशवंत शिंदे 80 वर्षांचे असल्याने त्यांना चालणंही जमत नाही. त्यामुळे ज्ञानेश्वर शिंदेंनी आपल्या वडिलांना खांद्यावर घेऊन सुमारे 350 किलोमीटर चालत प्रवास केला. यानंतर आता ते लोक संघर्ष मोर्च्यांच्या प्रमुख प्रतिमा शिंदे यांच्या मदतीने आपल्या वाशीम जिल्ह्यातील मूळ गावी पोहचले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-काही लोकांनी माझ्या मृत्यूसाठी प्रार्थना केली पण…- अमित शहा

-“गुजरातमधून कोरोना हद्दपार करायचा असेल, तर मुख्यमंत्र्यांना हटवा”

-नागरिकांनो घाबरू नका; भारत कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार-डॉ. हर्षवर्धन

-विधानपरिषद उमेदवारीबाबत शशिकांत शिंदे यांचा मोठा खुलासा

-“ज्या मुंबईने आम्हाला पोसलंय, तिला संकटकाळात सोडून जाणार नाही”