दुधाऐवजी ‘या’ गोष्टींचं सेवन करणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं!

मुंबई | सध्या धावत्या जीवनशैलीमुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या उद्धवत आहेत. आरोग्याच्या समस्या वाढत असतानाच कोरोनामुळे अनेकांना नवीन समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

कोरोना काळात अनेकांना आपल्या दैनंदिन जीवनशैलीत मोठे बदल करावे लागले. परिणामी आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. अशातच संशोधक सातत्यानं नवीन संशोधन करत आहेत.

महिला आपल्या शरीराला अधिक आकर्षक ठेवण्यासाठी आहाराचं नियोजन करतात. आहारात शरीराच्या रचनेस उपयुक्त गोष्टींचा प्रामुख्यानं समावेश करतात. म्हणून समस्या देखील वाढताना पहायला मिळत आहेत.

अशा परिस्थितीत बरेच लोक विशेषतः महिला आणि तरुण मुली त्यांच्या वजनाबाबत खूप सावध होत आहेत. त्या वजन वाढू नये म्हणून विविध प्रकारचे बदल आपल्या जेवणात करत आहेत.

दुग्धजन्य पदार्थांच्या आहारात समाविष्ट असण्यानं शरीराचं संतुलन राखण्यासाठी मदत होते. पण वजन वाढत असल्यानं काहीजण आमंड मिल्क किंवा सोया मिल्कचा वापर करत असतात. परिणामी याचा आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.

अन्न आणि आहार तज्ज्ञ प्रोफेसर इयान गिव्हन्स यांनी ओट्स, बदाम आणि सोया मिल्क सारख्या दुधाच्या इतर पर्यायांविरुद्ध चेतावणी दिली आहे. महिलांसाठी त्यांनी शुद्ध दुधाला पर्याय नाही असं सांगितलं आहे.

दुधाच्या कमतरतेमुळं महिलांच्या शरीरात प्रोटीनचं प्रमाण अत्यल्प दिसायला लागलं आहे. 11 ते 18 वयोगटातील मुलींमध्ये समवयस्क मुलांच्या तुलनेत प्रोटीन कमी आढळलं आहे.

बीन्स, नट आणि ड्रायफ्रूट्समध्ये लोह आढळते, परंतु मांसामध्ये ते जास्त प्रमाणात आढळते. पण मुली आपल्या आहारात मांस आणि दुधाचा समावेश करत नाहीत परिणामी त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत.

हिमोग्लोबीन, लोह, प्रोटीन, यांच्या कमतरेमुळं महिलांना समस्यांना सामोर जावं लागत आहे. परिणामी थकवा येण आणि एकाग्रता भंग होणं या समस्या जाणवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “शिवसेनेशी आमची युती होण्याचा प्रश्नच नाही, सोनिया गांधी यांना… “

 ऑनलाईन-ऑफलाईनचा गोंधळ वाढला, विद्यार्थ्यांनी केला शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर राडा

“…तर उद्धव ठाकरे आणि अजित पवारांसमोर मी स्वत: दुकानं फोडणार”

परमबीर सिंह प्रकरणात सर्वात मोठा खुलासा, अंडरवर्ल्ड डाॅन छोटा शकीलचं नाव घेतलं

 अण्णा हजारे ठाकरे सरकारवर बरसले, म्हणाले…