लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच एवढे रुपये जमा होणार! आदिती तटकरेंचा मोठा खुलासा

Ladki Bahin Yojana |  ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Annual Income) अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना आर्थिक मदत (Financial Assistance) म्हणून महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahan Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात (Bank Account) दरमहा (Every Month) दीड हजार रुपये (₹1500) जमा केले जातात. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी (Implementation) सुरू झाली असून, डिसेंबरपर्यंतचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. जानेवारीचे पैसे देखील लवकरच जमा होणार आहेत.

जानेवारीचे पैसे कधी मिळणार?

जानेवारीचे पैसे कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे. येत्या 26 जानेवारीच्या आधी जानेवारीचे पैसे लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana)  मिळतील, असे त्यांनी सांगितले आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल, असेही त्या म्हणाल्या.

महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) प्रचारावेळी (Campaign) ‘आमचे सरकार आले तर आम्ही महिलांना 2100 रुपये देऊ’ असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत भाजप नेत्या (BJP Leader) चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

आदिती तटकरेंची प्रतिक्रिया-

लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात 2100 रुपयांप्रमाणे पैसे येतील, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही विधानसभा निवडणुकीत महिलांना दिलेले (Ladki Bahin Yojana) आश्वासन लवकरच पूर्ण करू. या योजनेमुळेच महिलांनी महायुतीला भरघोस यश मिळवून दिले आहे.” त्यामुळे लवकरच महिलांच्या बँक खात्यात दरमहा 2100 रुपये जमा होतील, असे त्या म्हणाल्या.

याबाबत बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आगामी अर्थसंकल्पात (Budget) आणि त्यानंतरच्या काळात याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

News Title : Ladki Bahin Yojana to get 2100/- soon

महत्त्वाच्या बातम्या-

खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबद्दल केंद्र सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सैफ अली खानच नव्हे तर शाहरुख खानच्या घराची… पोलिसांचा मोठा गौप्यस्फोट!

क्रिकेटपटू, उद्योगपती, अभिनेता…‘या’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या अफेअरनं खळबळ!

वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, सरकारकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

तुम्हाला माहितीये का? कोण आहे सोशल मीडियाचा राजा; या ॲपने पटकावला पहिला नंबर