लालबागचा राजा सार्वजनिक गणेसोत्सव मंडळाला मुंबई महानगरपालिकेचा साडेतीन लाख दंड; कारण त्यांनी…

मुंबई | शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून लालबाग (Lalbaug) भागातील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (Lalbaughcha Raja) प्रसिद्ध आहे. संपूर्ण मुंबईतून लाखो भाविक या गणपतीच्या दर्शनाला येतात.

याच लालबागचा राजा मंडळाला मुंबई महानगरपालिकेने (BMC) मोठा दंड ठोठावला आहे. लालबागचा राजा मंडळाला पालिकेने तब्बल तीन लाख 66 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले होते. त्यामुळे पालिकेने ही कारवाई केली आहे. मुंबई पालिकेने 183 खड्ड्यांसाठी लालबागचा राजा मंडळाला जबाबदार धरले आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार प्रति खड्डा 2000 रुपये दंड आकारण्यात आला आहे. गणेशोत्सवानंतर अधिकाऱ्यांनी रस्त्यांची पाहणी केली आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मंडळाला याप्रकरणी पत्र पाठविण्यात आले आहे. लालबागमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि टी. बी. कदम मार्गावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात मोठे गणपती बसविले जातात. यावेळी पालिका काही नियमावली आखून देते. त्याचे पालन करावे लागते. अनेक मंडळे मंडप उभारताना रस्त्यांवर खड्डे करतात, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली येते.

महत्वाच्या बातम्या –

पत्राचाळ घोटाळ्यात आपला सहभाग आहे का? शरद पवारांचे एका वाक्यात उत्तर

खुशखबर! भारतीय पोस्टात ‘आठवी पास’ तरुणांना नोकरीची संधी

प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधनांवर मोठी टीका; म्हणाले, दारुड्याला दारु पिण्यास…

‘राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रकाश आंबेडकरांचे गंभीर आरोप’

संजय राऊत यांच्याबाबात मोठी खळबळजनक माहिती समोर; बेहिशेबी रक्कम त्यांनी चित्रपट आणि मद्य…