Presidential Election | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लालू प्रसाद यादव यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई | राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत.  निवडणुकीसाठी 11 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एका उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात आला. या उमेदवारांनी राष्ट्रपतीपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.

हे सगळे उमेदवार हौशी उमेदवार आहेत. यातील लालू प्रसाद यादव हे बिहारचे असले तरी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख नाहीत. यादीतील काही उमेदवारांची विविध कारणांनी चर्चा होत असते. यातील एका उमेदवाराचे नाव लिम्का बुक ऑफ रेकोर्डमध्ये नोंदवण्यात आलं आहे.

मोहम्मद ए हामिद पटेल आणि सायरा बानो मोहम्मद पटेल असे या दाम्पत्याचे नाव असून ते मुंबईतील आहेत. या दाम्पत्याने याआधीदेखील 2017 मध्ये निवडणूक अर्ज दाखल केला होता. यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान,बुधवारी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या 11 उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज रद्द करण्यात आला.

उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये चूक झाल्याने त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Presidential Election | राष्ट्रपती निवडणुकीबाबत मोठी बातमी; भाजपच्या बड्या नेत्याचा शरद पवारांना फोन 

“…तर पवार कुटुंबीयांची संपत्ती महाराष्ट्राच्या नावावर करावी” 

“आम्हाला ‘अशीच’ सुनबाई हवी”, भाजप खासदाराच्या आदित्य ठाकरेंसाठी खास शुभेच्छा

आषाढी एकादशीनिमित्त अनिल परब यांची मोठी घोषणा, म्हणाले…

“शतरंज का बादशाह म्हणजे देवेंद्र फडणवीस”