चारा घोटाळ्याप्रकरणी लालूंना न्यायालयाचा झटका, सुनावली ‘इतक्या’ वर्षांची शिक्षा

रांची | बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना दारोंडा चारा घोटाळा प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्यांना रांचीतील विशेष सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनावण्यात आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था डगमगाईला असलेल्या 1990 ते 1995 या पाच वर्षाच्या काळात दोरंडा कोषागारातून बेकायदेशीरपणे 139.35 कोटी रुपयांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. हे प्रकरण देशभर गाजलं.

त्यानंतर या प्रकरणात 1996 साली 170 आरोपींवर गुन्हा नोंदवण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून हे प्रकरण गाजत असताना लालू यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

15 फेब्रुवारी रोजी लालू यादव यांना न्यायालयाने दोषी ठरवलं होतं. त्यावर आज सुनावणी झाली. लालू यादव यांना दारोंडा चारा घोटाळा प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सोबतच लालू प्रसाद यादव यांना 60 लाखांचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. पाचव्या प्रकरणी लालू यादव यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दारोंडा चारा घोटाळा प्रकरणापूर्वी लालू प्रसाद यादव यांना इतर चार प्रकरणांमध्ये 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपींना तीन वर्षांपेक्षा कमी कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्यांमध्ये माजी आमदार आरके राणा आणि पशुसंवर्धन विभागाचे माजी सचिव बेक ज्युलियस यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –

रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा

…म्हणून साई पल्लवीने धुडकावली 2 कोटी रुपयांच्या जाहीरातीची ऑफर! 

‘ज्याच्या घामातून शिवसेना पुढे आली त्या राणेंना…’; ‘या’ शिवसेना नेत्याने राऊतांना सुनावलं

डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणी पोलीस तपासात झाला धक्कादायक खुलासा! 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय