लालू प्रसाद यादवांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली असल्याचे समजत आहे. लालूप्रसाद यादव यांच्या किडनी खराब झाल्या आहेत. त्यांच्या किडन्या आता 35 टक्के कार्यरत आहेत.

लालू प्रसाद यादव यांचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सतत बदलत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सध्याच्या त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आहे. 

लालू प्रसाद यादव चारा घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून दोषी आढळले आले आहेत. ते 14 वर्षाच्या कारावासाची शिक्षा भोगत आहेत. त्यांची प्रकृती खराब झाल्याने काही महिन्यांपासून ते रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्स रूग्णालयात उपचार घेत आहेत.

दरम्यान, काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थ असल्याने लालू प्रसाद यादव यांनी आपलं जेवणही कमी केलं आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या-