Top news देश

माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादवांचा पियुष गोयलांना टोला, म्हणाले…

नवी दिल्ली |   श्रमिक ट्रेनवरून गोंधळ सुरू असलेला पाहायला मिळत आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना देखील रंगलेला आहे. याच सगळ्या प्रकरणात आता देशाचे माजी रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी उडी घेतली आहे.

बिहारमधील पाटण्याला येण्यासाठी निघालेली ट्रेन पश्चिम बंगालमधील पुरुलियाला पोहचली. डिजीटल भारतामध्ये असं का होत आहे याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावं. गरिबांकडून तिकीटांचे पैसे घेतले. त्यांना 24 ते 30 तासाच्या प्रवासामध्ये पाणी आणि खाण्याचे पदार्थही दिले जात नाही आणि आता हा असा गोंधळ. याहून त्यांचा अधिक अपमान करण्याची एखादी कृती शिल्लक राहिली आहे का?, असं ट्विट बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी केलं होतं.

तेजस्वी यादव यांच्या या ट्विटवर त्यांचे वडील म्हणजेच लालू प्रसाद यादव यांनी खास आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली आहे. तेजस्वी यांचे ट्विट रिट्विट करताना कोट करुन, ‘रेल्वेगाड्या जरा जास्तच आत्मनिर्भर झाल्या आहेत’, असं म्हटलं आहे.

लालूप्रसाद यांचे हे ट्विट तेराशेहून अधिक जणांनी रिट्विट तर 6 हजार 900 हून अधिक जणांनी लाइक केलं आहे. बिहारला जाणारी ट्रेन पश्चिम बंगालला गेल्यावरुन लालू यांनी ही प्रतिक्रिया दिली.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-भाजपमधील माणसं सत्तेसाठी हपापलेली आहेत- पृथ्वीराज चव्हाण

-महाविकास आघाडी सरकार सध्या स्थिर आहे पण….- सुधीर मुनगंटीवार

-सरकार पाडण्यात आम्हाला काहीही रस नाही- देवेंद्र फडणवीस

-केंद्राने ठाकरे सरकारला आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोटींची मदत केली- देवेंद्र फडणवीस

-…म्हणून काॅंग्रेसनं सत्तेतून बाहेर पडावं; ज्येष्ठ काॅंग्रेस नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ