धोक्याची घंटा…. गेल्या 48 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची बाधा

मुंबई |  राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना कोरोनाच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिस दलातील जवानांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या 24 तासांत 288 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलातील 1666 पोलिस जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुर्दैवाची गोष्ट म्हणजे 16 पोलिस जवानांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असला तरी रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. तसंच पोलिस दलातील रूग्णांचं बरं होण्याचं प्रमाण देखईल खूप चांगलं आहे. आतापर्यंत 478 पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. यामध्ये 35 पोलीस अधिकारी आणि 438 पोलिस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत.

गुरुवारी रात्री विलेपार्ले पोलिस ठाण्यातील शिपाई, ठाणे पोलिस दलातील महिला शिपाई यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे दलात हळहळ व्यक्त होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘भाजपच्या रणांगणातून’ ही प्रमुख आणि महत्त्वाची व्यक्ती गायब, राज्यभर चर्चांना उधाण

-संकटात सापडलेल्या राज्याला सावरायचं सोडून आंदोलन करून दुहीची बिजं पेरली; आव्हाडांची टीका

-बंगालचं 1 लाख कोटी रूपयांचं नुकसान झालेलं असतानं 1 हजार कोटीत नुकसान कसं भरून येईल?- संजय राऊत

-नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा; 4-5 वर्षांपासून…

-रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅडची सोय करा; चाकणकरांची सहकाऱ्यांना विनंती