मुंंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत अनंतात विलीन झाला. सुशांतच्या पार्थिवावर विले पार्लेतील पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी पावणेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे वडील, बहीण, तिचा पती, मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते.
शोकाकुल वातावरणात वडिलांकडून त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. कूपर रुग्णालयापासून सुरु झालेल्या त्याच्या अखेरच्या प्रवासात वरुणराजानेही हजेरी लावली होती.
अभिनेत्री श्रद्धा कपूर, क्रिती सॅनन, अभिनेते विवेक ओबेरॉय, रणवीर शौरी यासारखे मोजके कलाकार वगळता मोठ्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली नाही.
दरम्यान, आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
महत्वाच्या बातम्या-
-सुशांतच्या आत्महत्येला हेच लोक कारणीभूत आहेत- कंगना रणौत
-“आपण झोपतो तेव्हा कोरोना विषाणूही झोपतो”
-“आपलं ते कार्ट अन् दुसऱ्यांचा तो बाब्या बोलणं बंद करा”
-“कोरोना रुग्णांसाठी मुकेश अंबानींचा अँटिलिया टॉवर ताब्यात घ्या”
-भारताला ‘या’ बाबतीत जगातल्या सर्वोच्च तीन देशांच्या क्रमवारीत आणायचंय- राजनाथ सिंग