मोठी बातमी! लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ICU मध्ये दाखल

मुंबई | भारताच्या गानकोकिळा ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना कोरानाची लागण झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असल्याची माहिती आहे.

लता मंगेशकर यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह येताच त्यांना रूग्णालयात नेण्यात आलंय. लता मंगेशकर यांचं वय पाहता होम क्वारंटाईन करणं शक्य नसल्यानं त्यांना कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गानकोकीळा लता मंगेशकर यांनी वयाची 92 वर्ष पूर्ण केली आहेत. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी झाला. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत.

1974 मध्ये, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने त्यांना इतिहासातील सर्वाधिक रेकॉर्डिंग केलेल्या कलाकार म्हणून स्थान देण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात गेल्या 24 तासात 1 लाख 68 हजार 63 कोरोना रुग्णांची नोंद झालीय.

तर 277 जणांचा मृत्यू (Corona Deaths)झालाय. ओमिक्रॉन (Omicron) बाधितांची संख्या देखील वाढली असून 4 हजार 461 वर पोहोचली आहे. मुंबईत देखील रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत होत चालली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! रेस्टॉरन्ट, बार, खासगी कार्यालये आजपासून बंद

“अभिनंदन, राज्याचा महसूल घटवून तुम्ही शरद पवारांना चर्चा करायला भाग पाडलंत” 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, सरकारने ‘या’ नियमात केला बदल 

सर्वात मोठी बातमी- ‘वोडाफोन आयडिया’वर सरकारची मालकी 

अजूनही लस न घेतलेल्यांनो सावधान; अत्यंत धक्कादायक माहिती समोर