मुंबई | गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास महिनाभर त्या हॉस्पिटलमध्ये होत्या.
लतादीदींची तब्येत काल (शनिवारी) अचानक बिघडली. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक मात्र स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं.
लतादीदी उपचाराला प्रतिसादही देत होत्या, मात्र रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त देशच नाही, तर जगभरातील चाहत्यांना या बातमीने सुन्न केलं आहे.
लता मंगेशकर यांना 8 जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाली. सोबतच त्यांना न्यूमोनियाही झाला होता. जवळपास गेल्या 30 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. शनिवारी लतादीदींची प्रकृती पुन्हा बिघडली.
महत्वाच्या बातम्या-
अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; मराठी चित्रपटासाठी गायलेलं गाणं लवकरच येणार
देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; केंद्र सरकारचं मोठं वक्तव्य
9 रुपयांचा शेअर 8 महिन्यात 650 रुपयांना, लाखाचे झाले असते 72 लाख
मोदींची स्तुती करणं विद्यार्थ्यांला पडलं महागात; विद्यापीठाने केलं असं काही की…