Top news महाराष्ट्र मुंबई

Lata Mangeshkar: न्यू यॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकला लता मंगेशकर यांचा फोटो

lata mangeshkar 2 e1644251074255
Photo Courtesy - Twitter/Raghuvansve

मुंबई | गाणसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झालं. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.

काल लतादीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लतादीदींच्या निधनामुळे देशात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. या काळात देशभरात तिरंगा अर्ध्यावर उतरवला गेला.

अशातच लतादीदींच्या जाण्याने फक्त भारतातच नाही तर जगातील 43 देशात अंत्ययात्रेचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आलं होतं. त्यावरून लतादीदींनी आयुष्यात खुप काही कमवल्याचं दिसून येतं.

अशातच आता न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर गाणसम्राज्ञी लता मंगेशकरांचा फोटो झळकला आहे. भारतातील लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे यांचा फोटो याआधी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर झळकला होता.

त्यानंतर आता लता मंगेशकर यांचा फोटो देखील न्यू याॅर्क टाईम्सवर झळकला आहे. आपल्या सुरेल आवाजानं कोट्यावधींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लता मंगेशकर यांच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे.

दरम्यान, लता मंगेशकर यांनी असंख्य चित्रपटांना आपला आवाज दिला. त्यांच्या गोड आवाजामुळे आज लाखो गाणी अजरामर झाली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हत्तीची गरज नाही, उदयनराजेंनी उडी मारली तरी मी चिरडून जाईल”

 “कोरोनाचा संसर्ग पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार”

मराठी कलाकार लतादीदींच्या अंत्यदर्शनला का नव्हते?, हेमांगी कवी म्हणाली…

 व्हॅलेंटाईन वीक! Rose Day का साजरा केला जातो?; जाणून घ्या इतिहास

  राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; पंजाबमध्ये धक्कादायक प्रकार घडला