निधनाच्या अफवांवर लता मंगेशकर यांनीच केलं ट्विट, म्हणाल्या…

मुंबई | कोरोना महासाथीच्या रोगाचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यातच कोरोनाची लागण होण्याची संख्याही झपाट्यानं वाढत आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नाहीये.

गेल्या आठवड्याभरापासून लता मंगेशकर यांची प्रकृती ठीक नाहीये. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. डाॅक्टर त्यांच्या प्रकृतीची अपडेट देत असतात.

सोशल मीडियावर लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या निधनाच्या बातम्याही व्हायरल होत आहेत.

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी वारंवार कुटुंबातूनही अपडेट दिली जात आहे. अशातच आता अफवांवर लता मंगेशकर यांच्या अधिकृत अकांऊंटवरुन ट्विट करण्यात आलं आहे.

दीदी यांची प्रकृती सुधारत आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या खोट्या बातम्या पसरवणं कृपा करून थांबवा, असं ट्विट करण्यात आलं आहे.

लता दीदींवर उपचार करणारे डॉ. प्रतीत समदानी याआधी म्हणाले होते की, दीदी 92 वर्षांच्या आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून त्यांना आणखी काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्या जेव्हा पूर्णपणे बऱ्या होतील तेव्हा त्यांना आयसीयूमधून बाहेर आणले जाईल.

लता मंगेशकर अजूनही आयसीयूमध्ये असल्याचं त्यांच्या डाॅक्टरांनी सागितलं आहे. त्यांच्यावर अजूनही उपचार सुरु असून याव्यतिरिक्त काही सांगू शकत नाही. फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना करा, एवढंच सांगेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

कोरोनासोबत लता मंगेशकर यांनी न्यूमोनियाचाही लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना आणखीन काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या – 

  येत्या 2 दिवसात ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

  “…तर बाॅलिवूड चित्रपटांचं महत्त्व कमी होण्याची शक्यता”; अभिनेत्यानं व्यक्त केली भीती

 अभिनेत्री समंथानं डिलीट केली घटस्फोटाची पोस्ट, पुन्हा चर्चांना उधाण

“राज्यातील सरकार बरखास्त करण्यापेक्षा केंद्र सरकार बरखास्त करा”

“बाळासाहेब असते तर विरोधकांची कावकाव, चिवचिव, फडफड, तडफड थंड पडली असती”