लता मंगेशकरांची वयाच्या 90व्या वर्षी इन्स्टाग्रामवर एंट्री; या ‘5’ व्यक्तींना करतात फॉलो

मुंबई : आजकाल सर्वांनाच सोशल मीडियाची क्रेझ असलेलं आपण पाहतो. आज सोशल मीडिया वापरत नाही असं क्वचितच कुणीतरी सापडेल. आज सोशल मीडिया ही सेलिब्रटींचीही गरज बनली आहे. सोशल मीडियाच्या या युगात काही असेही सेलिब्रेटी आहेत ज्यांनी अद्याप फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामवर त्यांची अकाउंट तयार केलेली नाहीत. असंच एक नाव होतं लता मंगेशकर ज्यांनी सोमवारी इन्स्टाग्रामवर अकाउंट तयार केलं.

लता मंगेशकर यांनी सोमवारी अधिकृतरित्या इन्स्टाग्रामवर वयाच्या 90व्या वर्षी एंट्री घेतली. नुकत्याच तयार केलेल्या या अकाउंटवर लता दीदींना 52 हजार पेक्षा जास्त लोक फॉलो करत आहेत. 

लता दीदींनी आता पर्यंत फक्त दोन पोस्ट केल्या आहेत आणि त्यांनी अवघ्या 5 व्यक्तींना फॉलो केलं आहे. या 5 व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्‍चन, सचिन तेंडुलकर, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचा समावेश आहे. 

शनिवारी 28 सप्टेंबरला लता मंगेशकर यांनी 90 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच रेकॉर्डिंग मोदींनी रविवारी मन की बातमध्ये सर्वांना ऐकवलं.

पंतप्रधानानी त्यांच्या परदेश दौऱ्या अगोदर लता दीदींना शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी लता दीदींना सांगितलं की, त्यांना लता दीदींच्या घरी जाऊन गुजराती पद्धतीचं जेवण जेवायला आवडेल. 

महत्वाच्या बातम्या-