लता मंगेशकर यांचं इंग्रजी गाणं ऐकलं का?, महेश काळेंनी शेअर केला व्हिडीओ

मुंबई | भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानं देशभर शोककळा पसरली आहे. आपल्या सुमधुर आवाजानं देशाच्या सांस्कृतिक इतिहासात आजरामर झालेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे लता मंगेशकर .

लतादीदींच्या निधनानंतर आता लतादीदींच्या कर्तुत्वाची परत एकदा आठवण येत आहे. लतादीदींच्या आवाजानं अनेक चित्रपट अजरामर झाले आहेत. अशात सध्या लतादीदींच्या एका इंग्रजी गाण्याची सध्या जोरदार चर्चा चालू आहे.

भारताचं नाव संबंध जगभर पोहोचवण्यात लतादीदींचा देखील वाटा आहे. देश आणि जगातील नागरिक त्यांच्या अनेक आठवणी शेअर करत आहेत. सध्या याच आठवणी सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत.

लतादीदींच्या कर्तुत्वाचे अनेक पैलू आता सर्वजण सांगत आहेत. लतादीदींनी आपल्या संपूर्ण काराकिर्दीत आपल्या मधूर आवाजानं रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

तब्बल 36 भाषांमध्ये 50 हजाराहून अधिक गाणी गाणाऱ्या लतादीदींनी इंग्रजीमध्ये देखील एक गाणं म्हणलं आहे. परिणामी दीदींच्या इंग्रजी गाण्याची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांनी लतादीदींच्या इंग्रजी गाण्याची गोष्ट आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे शेअर केली आहे. सध्या महेश काळे यांची ही पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.

कॅनडामध्ये आयोजित कार्यक्रमात लतादीदींनी कॅनडातील गायिका एनी मरे यांनी गायिलेलं  ‘यु निडेड मी ‘ हे गाणं गायिलं होतं. कॅनडातील श्रोतावर्ग देखील लतादीदींच्या आवाजानं मंत्रमुग्ध झाला होता.

गंभीर आजारांनी त्रस्त मुलांच्या मदतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लतादीदींनी गायिलेलं हे पहिलं इंग्रजी गाणं आहे. वयाच्या 55 व्या वर्षी लतादीदींनी हे इंग्रजी गाणं गायलं होतं.

ऐका गाणं – 

महत्त्वाच्या बातम्या – 

 “अजित पवारांनी धरणाची जागा देखील शिल्लक ठेवली नाही”

 “मंगेशकर कुटुंबीयांनी परवानगी दिल्यास ‘या’ शहरात लतादीदींचं भव्य स्मारक उभारू”

 “नाना तुम्हाला एवढंही सांगतोय, अंगावर आला तर शिंगावर घेऊ”

“हा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान, पंतप्रधान मोदींनी तात्काळ माफी मागावी अन्यथा…”

 “…म्हणून ह्रदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरून काढण्यात आलं”; पंतप्रधान मोदींची घणाघाती टीका