“आम्ही पण भारतीय, आम्हाला कोरोना म्हणणं बंद करा”; पाहा व्हिडीओ

चंदीगढ | जगभरात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. सर्वत्र आजकाल करोनाच्याच चर्चा सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतात. मात्र याचा त्रास भारतातील पूर्वेकडील राज्यातील काही विद्यार्थ्यांना होताना दिसत आहे. या विद्यार्थ्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.

आम्ही पंजाबमधील छोटं गाव चुन्नी कला येथे राहतो. आमचा चेहरा थोडा वेगळा आहे परंतु आम्ही भारतीय आहोत. करोना व्हायरस चीनमधून आला आहे. आम्ही चीनमधून आलेलो नाही, असं म्हणत विद्यार्थी व्हिडीओच्या आम्हाला कोरोना म्हणणं बंद करा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

दिमापुर 24*7 इन्स्टाग्राम या पेजवर शुक्रवारी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आम्हाला करोना, चिंकी, चायनीज म्हणणं बंद करा… नॉर्थ इस्ट स्टुडंट ऑफ पंजाब असं त्यावर लिहिण्यात आलं आहे.

दरम्यान, आम्हाला करोना, चिंकी, चायनीज म्हणणं बंद करा… नॉर्थ इस्ट स्टुडंट ऑफ पंजाब असं त्यावर लिहिण्यात आलं आहे.

https://www.facebook.com/dimapur247insta/videos/142582480403557/

महत्वाच्या बातम्या-

-डोनाल्ड ट्रम्प कोरोनाला म्हणाले ‘चिनी व्हायरस’; संतापलेल्या चीननं केली कारवाई

-…म्हणून रितेश देशमुख कोरोनाग्रस्त रुग्णावर संतापला

-राजभवनाच्या भिंतींना वाचाळ तोंड आहे हे मलिक यांनी उघड केलं- शिवसेना

-#corona | गर्दी टाळा नाहीतर…; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा

-कोरोनाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा अनोखा उपक्रम