खासगी क्लासच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत… लातूरच्या घटनेनं मोठी खळबळ – Latur Crime News

लातूर | शिक्षणाचा पेशा हा अत्यंत पवित्र पेशा मानला जातो. ज्ञानदानाचं काम करणाऱ्या या पेशाकडे अत्यंत आदरानं पाहिलं जातं. (Latur Crime News) मात्र याच शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना लातुरात घडली आहे. एका खासगी शिकवणी चालकानं आपल्याकडे शिकवणीसाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला वासनेची शिकार बनवलं आहे.

लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी शिकवणीसाठी आली असताना नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या आईनं यासंदर्भात पोलिसांकडे धाव घेतली त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. किशोर मामडगे असं यासंदर्भातील आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

किशोर मामडगे हा क्लासचालक आहे. लातूरच्या ट्यूशन परिसरात त्यांचा क्लास आहे. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे क्लास तो घेतो. मात्र या अशा प्रकारामुळे लातूरमधील पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमी वाचली का?- पुरुषांच्या सेक्स लाईफबद्दल सर्वात मोठा खुलासा, ‘या’ प्रकारच्या पुरुषांना मागणी वाढणार?

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनूसार, 26 डिसेंबर रोजी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे खासगी शिकवणीसाठी गेली होती. यावेळी मामडगेने पीडित मुलीवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. घाबरलेल्या मुलीनं घरी आल्यानंतर आपल्या आईला हा प्रकार सांगितला.

पीडितेच्या आईला घडलेल्या प्रकारानं मोठा धक्का बसला, तीनं पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीच्या अत्याचाराचा पाढा वाचला. पोलिसांनी या प्रकरणात लगेचच गुन्ह्याची नोंद करुन घेतली आणि आरोपी किशोर मामडगेला बेड्या ठोकल्या.

आता किशोर मामडगेची पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्याच्याकडून आणखी काही माहिती मिळते का याचा प्रयत्न केला जात आहे, तसेच या भागातील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात असल्याचं सांगितलं जातंय.

महत्वाच्या बातम्या-

रतन टाटांनी लग्न का केलं नाही?, समोर आलं सर्वात मोठं कारण

नवरीच कोरोना पॉझिटिव्ह!; ठाकरेंच्या नव्या सूनबाईंनी दिली माहिती

Omicron पासून वाचण्यासाठी असा करा स्वत:चा बचाव; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला 

पुढील 24 तास महत्त्वाचे; राज्यातील काही भागात पावसाची शक्यता 

‘या’ महिन्यात भारतात दररोज 2 लाख रूग्ण आढळतील, तज्ज्ञांच्या दाव्याने खळबळ