पुणे | कोव्हीड 19 संक्रमणाच्या काळात राज्यातील अनेक पत्रकारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. मात्र, लोकांचे प्रश्न सातत्याने मांडत राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नोकरी गेल्यानंतरही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी काही पत्रकारांनी स्वत:चे बातम्यांचे यू ट्यूब चॅनेल्स तसेच वेब पोर्टल सुरू केले. त्याचबरोबर अनेक खासगी दर्जेदार वेबपोर्टल व वृत्त वाहिन्या राज्यात आधीपासून चांगले काम करत आहेत. त्यांना सरकारी जाहिरातीचे पाठबळ मिळावे, अशी विनंती भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे निवेदन सुनील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाला आज दिले आहे. तसेच त्यांना ई मेलद्वारे देखील पत्र पाठवलं आहे. त्याचप्रमाणे माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांनाही या मागणीचे निवेदन सुनील माने यांनी आज प्रत्यक्ष भेटून दिले.
मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात माने यांनी म्हटलं आहे की, कोवीड १९ संक्रमणामुळे अनेक क्षेत्राला फटका बसला, पत्रकारिता क्षेत्रही त्याला अपवाद राहिले नाही. कोरोनामुळे अनेक पत्रकारांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या.
काही ठिकाणी त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. मात्र, लोकांचे प्रश्न सातत्याने मांडत राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य या पत्रकारांनी सुरूच ठेवले आहे. नोकरी गेल्यानंतरही लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी काही पत्रकारांनी स्वत:चे बातम्यांचे यू ट्यूब चॅनेल्स तसेच वेब पोर्टल सुरू केले आहे.
त्याचबरोबर अनेक खासगी दर्जेदार वेब पोर्टल व वृत्त वाहिन्या राज्यात आधीपासून चांगले काम करत आहेत. हा प्रसिद्धी माध्यमांचा नवा मान्यताप्राप्त प्रकार आहे. हा प्रकार सध्या लोकप्रिय होत आहे. मात्र त्यांना उत्पनाचे साधन प्राप्त होत नाही. त्यांना चांगल्या प्रकारचे काम करण्यासाठी उत्पन्नाचे साधन निर्माण करणे आवश्यक आहे.
म्हणूनच अशा प्रकारच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, मजकूर तपासून त्याची योग्यप्रकारे छाननी करून,कंटेंट योग्य असणाऱ्या वेब पोर्टल तसेच यू ट्यूब चॅनेल्सना सरकारी जाहिराती सुरू करून त्यांना सरकारी जाहिरातीचे पाठबळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे ते यापुढेही चांगल्या पद्धतीने काम सुरू ठेऊ शकतील, अशी मागणी सुनील माने यांनी केली आहे. अदिती तटकरे यांनी या निवेदनावर सकरात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले आहे.
महत्वाच्या बातम्या-
पती विरोधात दीपिकानं केली तक्रार, रणवीरने वचन तोडलं आणि…
…म्हणून मुलाच्या मृत्यूनंतर देखील सिद्धार्थची आई घेत आहे शेहनाजची काळजी
‘जराही लाज वाटत नाही का?’, अंडरवियर जाहिरातीमुळे वरुण धवन वादाच्या भोवऱ्यात