Top news

‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय गुंडाळणार; भारतात करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली | मोबाईलचं उत्पादन करणारी ‘लावा’ या कंपनीनं आपला चीनमधील व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय घेतला आहे. लावा इंटरनॅशनलकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. भारतात करण्यात आलेल्या धोरणात्मक बदलांनंतर कंपनीनं आपला व्यवसाय भारतात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपनीनं मोबाईल फोन डेव्हलपमेंट आणि उत्पादन वाढीसाठी पुढील पाच वर्षात भारतात 800 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्पादनाच्या डिझायनिंग क्षेत्रात चीनमध्ये कमीतकमी आमचे 600 ते 650 कर्मचारी आहेत. आम्ही आता हे काम भारतात नेलं आहे. उत्पानांच्या विक्रीची आवश्यक ती गरज भारतातीलच कारखान्यातून पूर्ण केली जाईल. आम्ही यापूर्वी चीनमधून आमचे फोन जगभरात वितरीत करत होतो. पण आता आम्ही ते भारतातून करणार आहोत, अशी माहिती लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हरी ओम राय यांनी दिली.

दरम्यान, चीनमध्ये व्यवसाय करत असलेल्या अमेरिकन कंपन्यांना भरतात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. एप्रिल महिन्यात सरकारनं 1000 पेक्षा अधिक कंपन्यांशी संपर्क साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-टोमॅटोमध्ये व्हायरस शिरल्याची अफवा, विश्वास ठेवू नका!

-कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू; एका दिवसात 79 पोलिसांना कोरोनाची लागण

-आत्मनिर्भर कृषीविषयक पॅकेजच्या घोषणांवर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…

-…म्हणून पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियांना काशी विश्वनाथाच्या मंदिरात बंदी!

-कागदी घोडे नाचवण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणे महत्त्वाचे- एकनाथ शिंदे