…तर मी माझा पक्ष वंचितमध्ये विलीन करेन- लक्ष्मण माने

सोलापूर | बाळासाहेब आंबेडकरांनी जर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत आणि डाव्याविचार सरणीच्या पक्षांसोबत आघाडी केल्यास मी माझा पक्ष वंचितमध्ये विलीन करेन, असं महाराष्ट्र वंचित आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी म्हटलं आहे. ते सोलापूरमध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

लोकसभा निडणुकीच्या निकालानंतर लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीची साथ सोडली मात्र आता आपली ही अट मान्य केल्यास आपण पुन्हा एकदा पक्षात सामिल होऊ असं मानेंनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दुसरीकडे आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय मात्र ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही, आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आपण काँग्रेससोबत आघाडी करणार नसल्याचं सांगितलं आहे.  

भाजपला गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर ईव्हीएमच्या आधारावर सत्ता मिळाली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास चित्र वेगळं असेल, येत्या काळात ईव्हीएमविरोधात अहिंसात्मक आंदोलन उभं करणार असल्याचंही लक्ष्मण माने यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे 76 जागांची मागणी केली आहे. 2 ते 3 दिवसात जागा वाटप होईल, असं माहिती मानेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत काय होणार? हे येत्या काळात स्पष्ट होईल.

महत्वाच्या बातम्या-