‘एकदोन नाही तर दीड डझन मंत्री…’; ‘या’ नेत्याने केला खळबळजनक दावा

लखनऊ | ओबीसी नेते आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी खळबळजनक दावा केला आहे. सगळ्या गोष्टी ठरल्यानुसार होत आहेत. एकदोन नाही तर दीड डझन मंत्री राजीनामे देणार आहेत, असं वक्तव्य ओमप्रकाश राजभर यांनी केलं आह.

भाजपची साथ सोडून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून मी हे सांगत आलो आहे आणि त्याची सुरुवात आता झाली आहे.

14 तारखेपर्यंत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होणार आहेत. राज्यपालांकडे राजीनाम्यासाठी लाइन लागणार आहे. 20 जानेवारीपर्यंत एकूण 18 मंत्री राजीनामा देतील’, असा दावा राजभर यांनी केला आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा घोषणा झाल्यानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. मंगळवारी योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देत भाजपला पहिला मोठा धक्का दिला होता. त्यांच्यासोबतच अन्य तीन आमदारांनीही राजीनामे दिले होते.

या सर्वांनी सपात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असताना आज दारा सिंह चौहान यांनीही भाजपला दुसरा धक्का दिला.

योगींवर उघडपणे नाराजी व्यक्त करत मंत्री आणि आमदार भाजपला रामराम ठोकत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या राजकीय भूकंपावर ओमप्रकाश राजभर यांनी महत्त्वाचा दावा केला आहे.

उत्तर प्रदेशात काँग्रेसची अवस्था बिकट आहे, बसपा बेदखल आहे आणि भाजपला येथून निरोप देण्याचा निश्चय जनतेने केला आहे म्हणजे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत हे तुम्हीच ओळखा, असं राजभर म्हणालेत.

राजभर यांनी सपा आणि मित्रपक्षांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. भाजप 50 जागांच्या पुढे जाऊ शकणार नाही, असंही ओमप्रकाश राजभर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ लोकांना Omicron चा सर्वात जास्त धोका ; WHO ने दिला गंभीर इशारा 

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्रीच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही” 

पुणेकरांसाठी गुड न्यूज; शहरातील निर्बंधांबाबत अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती 

काळजी घ्या…, कोरोना रुग्णांमध्ये दिसत आहेत ‘ही’ नवी लक्षणं