Top news क्राईम तंत्रज्ञान

सुरक्षित इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी ‘या’ सहा टिप्स नक्की जाणून घ्या…

नवी दिल्ली | जगभरात सध्या कोरोनाची महामारी आहे. सर्व व्यवसाय ठप्प आहे आणि नोकऱ्या काही प्रमाणात सुरू आहे. पण कोरोनामुळे सर्व लोक डिजिटल माध्यमाशी जोडले गेले आहे. सध्या ज्यांना डिजिटल माध्यम वापरता येत नाही, ते हळूहळू शिकत आहे. सध्याच्या डिजिटल युगात ज्यांना डिजिटल माध्यम हे नवीन आहे, त्याचा गैरफायदा काही हॅकर्स घेत आहे.

सध्या डिजिटल माध्यमांद्वारे बँकेच्या खात्यातुन पैशांच्या चोरीचे प्रमाण वाढले आहे. डिजिटल माध्यम वापरणाऱ्यांच्या एका चुकीमुळे त्यांच्या खात्यातील सर्व पैसे गायब होतात. यातच तुम्ही जर इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर काही गोष्टी कायम ध्यानात ठेवल्या पाहिजे.

१. मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन फिचर-

या सुविधेमुळे सिंगल पासवर्ड क्रॅक करता येत नाही. सर्व बँकिंगच्या अ‌ॅप्समध्ये या सुविधेचा वापर करणे गरजेचे आहे. यामध्ये युजरला लॉगिन करून फिंगरप्रिंट स्कॅनर, ओटीपी, डेबिट कार्डसारख्या गोष्टींची गरज पडते.

२. एम्बडेड सिमकार्डचा वापर-

एम्बडेड सिमकार्डचा वापर करून युजर आपल्या क्रेडिट कार्डची माहिती नियर फिल्ड कम्युनिकेशन (एफएफसी) द्वारे सुरक्षितरित्या डाउनलोड करू शकतो. या सुविधेमुळे युजरला कोणतेही डेबिट आणि क्रेडिट कार्ड सोबत घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही.

३. एन्ड टू एन्ड इनक्रिप्शन-

सध्या डिजिटल व्यवहार तेजीने वाढत आहे. जगभरात पेमेंट कार्ड, मर्चंट खाते, बँक कार्ड्स अशा विविध माध्यमातून रोज अब्जाधींचे व्यवहार होतात. यावर हॅकर्सची नजर असते. या सुविधेमुळे तुमचा डेटा सुरक्षित राहण्यास मदत होते.

४. इन डिस्प्ले फिंगरप्रिंट डिव्हाईसेस-

सध्या सर्व बँकिंग अ‌ॅप्स फिंगरप्रिंटची सुविधा देत आहेत. पण ही सुविधा इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असलेल्या मोबाईलमध्येच उपलब्ध आहे. यामुळे आयपी अ‌ॅड्रेस, लोकेशन, दिवसाची माहिती, डिव्हाईस टाईप, ब्राऊजर अशा विविध गोष्टींची माहिती मिळते.

५. रियल टाईम टेक्स्ट आणि ईमेल अलर्ट-

तुमच्या खात्याचा प्रत्येक व्यवहार तुम्हाला मिळण्यासाठी रियल टाईम टेक्स्ट आणि ईमेल अलर्टचे सूचना चालू ठेवली पाहिजे. जर तुम्हाला ही सुविधा मिळत नसेल तर एकदा बँकेत जाऊन चौकशी करा, कारण तुमच्या खात्यात जर कधी पैशांची फसवणूक झाली त्याची तुम्हाला त्वरित माहिती मिळते.

६. अ‌ॅपचा सोर्स तपासणे-

काही हॅकर्स अगदी बँकेच्या अ‌ॅपप्रमाणे दिसणारे अ‌ॅप प्ले स्टोअरवर टाकतात. यातच तुम्ही जर एखादे अ‌ॅप गडबडीत डाउनलोड केले तर फोनमधील सर्व डेटा चोरीला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणतेही अ‌ॅप डाउनलोड करताना सर्व माहिती काळजीपूर्वक पाहूनच ते इन्स्टॉल केले पाहिजे.

महत्त्वाच्या बातम्या-