जाणून घ्या कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ फायदे

घरात सहज उपलब्ध असणारा आणि बाजारातही अगदी कमी किंमतीत मिळणारा कढीपत्ता आरोग्याच्या अनेक तक्रारींसाठी उपयुक्त असतो. जेवणाची चव वाढविण्यासाठी कढीपत्त्याच्या पानांचा उपयोग हमखास केला जातो. भारतीय पक्वान्नांमध्ये कढी पत्त्याचा वापर फक्त फोडणी लावण्यासाठी केला जाता. याला ‘गोड लिंबं’देखील म्हटले जाते.

कढीपत्तामधे विशिष्ट प्रकारचा सुगंध असल्यामुळे निरनिराळ्या चटण्यामध्ये, भाज्यांमध्ये व मसाल्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. कढीपत्त्याचे अनेक फायदे असलेले पहायला मिळतात.

कढीपत्ता खाण्याचे फायदे – 

1. कढी पत्त्यांमध्ये व्हिटॅमिन बी1 बी3 बी9 आणि सी असतं. त्याशिवाय यात आयरन, कॅल्शियम आणि
फॉस्फोरस असतं. याचे सेवन रोज केल्याने तुमचे केस काळे लांब आणि दाट होऊ लागतात. एवढंच नव्हेतर हे केसांमध्ये असणार्‍या डैंड्रफ
पासून देखील बचाव करतो.

2. कढीपत्ता त्वचेसाठीही अतिशय उपयुक्त असतो. त्वचा चमकदार होण्यास कढीपत्त्याचा चांगला उपयोग होतो. कढीपत्त्याची पेस्ट चेहऱ्याला लावल्यास पिंपल्स कमी होण्यास मदत होते.

3. कढीपत्यात असलेले फायबर रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते. याशिवाय कढीपत्यात पचनक्रिया बळकट बनवण्याचे गुणधर्म आढळतात.

4. कढीपत्त्यामध्ये असणारे गुणधर्म पित्तदोष कमी होण्यास उपयुक्त असतात. त्यामुळे आहारात कढीपत्त्याचा समावेश करावा.

5. कढीपत्त्याची पाने ही रक्तवर्धक व रक्तशुद्धीकारक आहेत. या पानांच्या नियमित सेवनाने रक्ताचे प्रमाण वाढून रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

6. लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसेच आयोडिनचे भरपूर प्रमाण असलेला कढीपत्ता हे स्वयंपाकघरातील एक महाऔषध आहे, असे म्हणता येईल. कढीपत्त्याच्या वापराने पचनसंस्था सुधारता येते. तसेच रुक्ष, गळणाऱ्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते.

7. त्वचेच्या विकारापैकी हा एक त्रास अनेकांना सतावतो. पिरेड्सच्या आधी किंवा नंतर कित्येकांना हा त्रास होत असतो. तुमच्या या त्वचेच्या त्रासावर कढीपत्ता फायदेशीर आहे. कडीपत्त्यामधील व्हिटॅमिन A,B,E तुमचे पिंपल्स आणि त्याचे डाग कमी करते.

8. कढीपत्त्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते. याचा अपचनाच्या समस्या कमी होण्यास अतिशय उपयोग होतो. कढीपत्ता अपचनाच्या समस्येपासून आपला बचाव करतो.

महत्वाच्या बातम्या – 

‘बिग बाॅस’ फेम ‘ही’ अभिनेत्री करणार लवकरच बाॅलिवूडमध्ये पदार्पण?, सोशल मीडियावर रंगली चर्चा

मुख्यमंत्री बलात्काऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, संजय राठोडला तर चपलेने झोडायला पाहिजे- चित्रा वाघ

‘या’ अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज पाहूण चाहते घायाळ, पाहा फोटो

‘मी मर्द आहे असं पुन्हा केव्हा म्हणू नका’; निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टिका

मोठी बातमी! ‘या’ कारणाने महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी