मनोरंजन

अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं; पोलीस कर्मचाऱ्यांना दिली ‘ही’ खास भेट

मुंबई | लॉकडाउन काळात शहराच्या बंदोबस्ताची काळजी घेण्याचं काम पोलिसांच्या खांद्यावर आहे. यावेळी आपल्या घरातल्या लोकांची चिंता न करता पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. आतापर्यंत मुंबई पोलीस दलातील अनेक कर्मचाऱ्यांना करोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि त्यांच्या पत्नी निवेदीता सराफ यांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

सराफ दाम्पत्य लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतात. हा भाग ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांच्याशी संपर्क साधत अशोक आणि निवेदीता सराफ यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना आमरस पुरीचं जेवण द्यायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली.

दरम्यान, पोलीसांकडून परवानगी मिळताच सर्व कर्मचाऱ्यांसाठी आमरस पुरीचं जेवण तयार करत स्वतः निवेदीता सराफ पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. सध्याच्या खडतर परिस्थितीत तुम्ही जे काम करत आहेत, ते कौतुकास्पद आहे. तुमच्याबद्दल मनात कायम आदर आहे आणि तसाच राहिलं, अशा शब्दांत सराफ दाम्पत्याने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

-‘तुझ्या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार’; प्रवीण तरडेंनी ‘त्या’ शेतकऱ्याला दिला शब्द

-कोरोना हे तिसरं महायुद्ध, चीनी वस्तूंवर बहिष्कार घालून धडा शिकवला पाहिजे- रामदास आठवले

-झेपत नाहीये हे कबूल करण्याचा प्रमाणिकपणा नाही; भाजपचा जयंत पाटलांना टोला

-रामजन्मभूमीचं सपाटीकरण करत असताना सापडल्या प्राचीन मूर्ती-शिवलिंग; वाचा संपूर्ण प्रकार

-महिला पोलिसानं केलेलं ‘हे’ कौतुकास्पद काम पाहून तुम्हीही त्यांना सलाम ठोकाल!