नवी दिल्ली | सोशल मीडियावर हल्ली अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूपच धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ मजेशीर आणि खुपच हस्यास्पद असतात.
अनेकांना झूलॉजी जास्त रस असतो. काहींना प्राणी पाळण्यामध्येही इंट्रेस्ट असतो. आणि ज्यांना प्राणी पाळण शक्य होत नाही. अशी लोक टीव्हीवर डिस्कवरी सारख्या चॅनलवरील प्राण्यांचे जंगालातील शूट केलेले व्हिडीओ पाहत असतात. तसेच सोशल मीडियावर प्राण्यांचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.
त्यामध्ये बिबट्याचेही असतात. आपल्या सगळ्यांनाच म्हणजे सर्व सामान्य लोकांना जंगलातील कोणत्याही प्राणी असो त्याची भितीही वाटतच असते. काहींना जंगली प्राण्यांच नाव काढलं तरी त्यांना भिती वाटते. आपल्याला माहित असेल की, बिबट्या हा प्राणी शिकार करण्यात खूप तरबेज असल्याचं बोललं जात.
त्याने एकदा त्याच शिकार ठरवला तर, तो त्याच्या लचका तोडल्याशिवाय राहत नाही. परंतू व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तर चक्क एक बिबट्या एका घरात शिरला असल्याचं समजतं आहे.
या व्हिडीओमध्ये एक बिबट्या एका घरात शिरला आहे. एका घराच्या बाहेर ओट्यावर तो आला आहे. बिबट्या ज्यावेळी घरात म्हणजेच घराच्या ओट्यावर आला आहे. ती वेळ साधारण रात्रीची असावी. कारण त्या ठिकाणी पूर्णपणे शांतता असून, शिवाय त्या ठिकाणी कोणताच माणूस दिसत नाहीय.
सुरूवातीला बिबट्या हळू-हळू दरवाजातून एका घराच्या आत शिरतो. कोण आहे का, याचा कानोसा घेत-घेत तो पुढे-पुढे पाऊलं टाकतो. चारही दिशेला जाऊन पुन्हा खात्री करतो की, आजुबाजुला कोणी आहे का म्हणून. बिबट्या घरात शिरला त्यावेळी कोणताही घरातील माणूस बाहेर पडला नाही म्हणून, सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचं समजतं आहे.
बिबट्याचा हा व्हिडीओ त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. हा व्हिडिओ एका यूजरने आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओ अनेकांनी पाहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
माणुसकीला जागत कुत्र्याला वाचवण्यासाठी ‘या’ प्रकारे तरूणाने घेतली धाव, पाहा व्हायरल व्हिडीओ
अभिनेत्री रसिका सुनीलच्या ‘या’ फोटोंची सोशल मीडियावर होतीय चर्चा, पाहा व्हायरल फोटो
धावत्या ट्रेननं मध्ये आलेल्या ट्रकला दिला धक्का अन्…, पाहा अंगाचा थरकाप करणारा व्हिडीओ
चक्क भर मंडपातच नवरा-नवरीचं भांडण जुपलं; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हायरल व्हिडीओ