“सुशिक्षित वाहनचालकांपेक्षा कमी शिकलेले वाहनचालक चांगलं वाहन चालवतात”

मुंबई |  जास्त शिकलेल्या वाहन चालकांपेक्षा कमी शिकलेले वाहन चालक चांगलं वाहन चालवतात, असं वक्तव्य केंद्रिय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

कमी शिकलेल्या वाहन चालकांवरील अन्याय दूर करण्यासाठी राष्ट्रीय मोटार वाहन कायदा करण्यात आला आहे. आणि त्यामधून शिक्षणाची अट देखील काढण्यात आली आहे, असं गडकरी म्हणाले.

दहावीपेक्षा कमी शिकलेल्या लोकांना याचा सर्वाधिक फायदा होईल. यातून 25 लाख चालकांची उणीव भरून निघेल, असंही ते म्हणाले. वाशीत एका कार्यक्रमाला गडकरींनी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते.

प्रदुषण कमी करण्यासाठी देशात यापुढे इलेक्ट्रिक, बायो सीएनजी आणि इंधान वापराला प्राधान्य देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या धरतीवर मुंबई-दिल्ली हा एक्सप्रेस वे तयार करण्यात येणार आहे. परंतू हा मार्ग इलेक्ट्रीक असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

-…अखेेर NDRF च्या प्रयत्नांना यश; मुख्यमंत्र्यांनी केलं तोंडभरुन कौतुक

-“पेशवाईची गिधाडं झडप घालण्याच्या तयारीत; आपण वेळीच त्यांना रोखू”

-“चित्रा वाघ यांनी पक्षात राहून पक्षाचं नुकसान केलं; आम्हीच हकालपट्टी करणार होतो”

-चित्रा वाघ आणि सचिन अहिर यांच्या राजीनाम्यावर मेहबूब शेख यांची आक्रमक प्रतिक्रिया!

-‘होय, मी शरद पवार साहेबांच्या सोबत आहे…; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सोशल मीडियावर मोहीम