पक्षाच्या चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाची शिंदे गटाला महत्त्वाची सूचना!

नवी दिल्ली | भाजपचा मागून वरदहस्त असलेला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट आणि शिवसेना यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) विविध अशा सहा खटल्यांवर निकाल प्रलंबित आहे. न्यायालयाने आजचे कामकाज पूर्ण करत पुढील सुनावणी 8 ऑगस्टला सांगितली.

आजच्या सुनावणीत दोनही गटांनी मोठा युक्तीवाद केला. या निकालाची दोनही गटांना आणि महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे. पण न्यायालय याप्रकरणी तारीख पे तारीख करत असल्याने आता सोमवार पर्यंत थांबणे प्राप्त आहे.

पक्षांतरबंदी कायदा असंतोषाला विरोध करणारा असू शकत नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील हरीश साळवे (Harish Salave) यांनी केला. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या (Election Commission) अधिकारांत हस्तक्षेप करु शकत नाही, असे सांगत खटल्याला न्यायालयाने पुढील तारीख दिली.

महाविकास आघाडी सरकारने शिंदे गटाच्या 16 आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई केली होती. त्या कारवाईवर निर्णय घेण्याचा आदेश विधानसभाघ्यक्षांना द्या. अशी भूमिका शिंदे गटाने घेतली होती. त्यावर तुम्ही हे ठरवणारे कोण म्हणत, न्यायालयाने शिंदे गटाला खडसावले.

ज्यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई केली होती. तेव्हा शिंदे गटाने त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. आणि आता त्यांनी भूमिका बदलली आहे.

आम्ही शिवसेना सोडली नाही, त्यामुळे 15 आमदारांचा गट 40 आमदारांच्या गटाला अपात्र ठरवू शकत नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाने केला होता. तर शिवसेनेकडून त्यांनी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे अशी भूमिका मांडली.

न्यायालयाने दोनही पक्षांचे युक्तीवाद एकूण घेत, दोनही पक्षांना सोमवार पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावर आता पुढील सुनावणी सोमवारी 8 ऑगस्ट रोजी होणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

“अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले”

भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते होणार- नितीन गडकरी

उर्फीने कपड्यांऐवजी गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ

मनसेचे शिंदे गटावर गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय