उस्मानाबाद | राष्ट्रवादीच्या (Ncp) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीला साकडे घातलं आहे. पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्यात.
पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होऊ दे पूर्ण राष्ट्रवादी घेऊन नवस फेडणार, असं त्या म्हणाल्या. तसंच खरंतर आपल्याला काय मिळालं, याबद्दल देवळात आभार मानण्यासाठी येत असते. मंदिरात आल्यानंतर इथं जमलेले कार्यकर्ते आणि पुजारी यांनी काही तरी मागणी करावी अशी मागणी केली होती. त्यावेळी राज्यात चांगला पाऊस पडू दे. देशातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. त्याला दिलासा मिळू दे, असं साकडं घातलं, असं सुळे यांनी सांगितलं.
यावेळी महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी होणार, असं पत्रकरांनी विचारलं. यावर महाराष्ट्राची जनता ही राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवेल, मी ठरवू शकत नाही, असं त्या म्हणाल्या.
मी याबद्दल काही सांगू शकत नाही. मी काही ज्योतिष्य सांगणारी नाही. मी मुख्यमंत्री व्हावं याबद्दल कधी विचार केला नाही, असं सुप्रिया सुळेंनी पत्रकारांना सांगितलं.
यावेळी प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे यांचा ताफा काही मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी अडवला. सुळे यांनीही रस्त्यावर गाडी बाजूला घेतली आणि नाराज कार्यकर्त्यांची भेट घेतली. त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्याचं पाहायला मिळालं.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी | भाजपकडून राज्यसभेसाठी उमेदवार जाहीर
मोठी बातमी ! प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसे वाला यांची हत्या
मोठी बातमी ! मान्सून केरळमध्ये दाखल, ‘इतक्या’ दिवस आधीच आगमन
“आमच्या बापाची बदनामी होत असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही”
“धर्माची गोळी दिली तर लोक झोपून राहतात हे त्यांना माहीत आहे, त्यामुळे….”