‘आओ कुछ तूफानी करते है’; अमृता फडणवीसांचं नवं ट्विट चर्चेत

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस या सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असलेल्या पहायला मिळतात. नव्या गाण्यामुळे त्या नेहमी चर्चेत असतात. त्याचबरोबर त्या आपल्या वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेचा विषय ठरत असतात.

अमृता फडणवीस यांना गायनाची आवड आहे. त्यांच्या या आवडीमुळे त्या नेहमी नवनवीन प्रयोग करत असतात. मात्र त्यांच्या गायनाच्या शैलीमुळे त्यांना कायम टिकेला तोंड द्यावं लागतं. त्याचबरोबर त्या राजकीय मुद्द्यावरुनही चर्चेत येत असतात.

सध्या अमृता फडणवीस यांनी एक नवीन ट्विट करत सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी म्हटलं की, आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम …. मी पुन्हा येत अहे !!!

अमृता फडणवीसांच्या या ट्विटनं आता खळबळ माजवली आहे. आता अमृता फडणीस आता काय तुफानी करणार हे याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मुंबई क्रुझ प्रकरणावरुन राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शाब्दिक युद्धात आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उडी घेतलेली पहायला मिळाली.

‘बचाना है इन्हें अपना जमाई और काली कमाई’ अशी कविता करत अमृता फडणवीस यांनी नवाब मलिकांवर हल्लाबोल केला होता. त्यांचं हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं.

महत्त्वाच्या बातम्या –  

  पुणेकरांना दुसरा झटका! रिक्षा दरवाढीनंतर आता सीएनजीही महागला

  “सत्तेवर येण्यासाठी पवार साहेब पावसात भिजले, पण त्यांना एसटी कर्मचारी पावसात भिजलेले दिसले नाही”

  “मला आता रडू येतंय, मी वेगवेगळ्या पातळ्यांवर लढतोय”

मोठी बातमी! एसटी महामंडळाचं खासगीकरण होण्याची शक्यता

 “अरे कुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर आलं, त्यातही राजकारण करायला लाज वाटली नाही का?”