मुंबई | भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) बेरोजगार तसेच सुशिक्षीत तरूणांसाठी प्रचंड मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ‘एलआयसी’कडून लवकरच ‘असिस्टंट क्लार्क’ या पदासाठी मेगा भरती करण्यात येणार आहे. एलआयसीमध्ये 8 हजार पदांची मेगाभरती होणार असल्याची माहिती आहे.
‘एलआयसी’कडून तब्बल 24 वर्षांनंतर पदभरती केली जात आहे. या संदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, ‘असिस्टंट क्लार्क’ पदासाठी पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा घेतली जाईल.
पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा असे परीक्षेचे स्वरुप असेल. पूर्व परीक्षेसाठी रिझनिंग अॅबिलिटी, न्यूमेरिकल अॅबिलिटी आणि इंग्रजी हे तीन विषय असून, ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे असे परीक्षेचे स्वरूप असेल.
यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक असून त्याचे वय १८ ते ३० दरम्यान असावे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयाची अट शिथील करण्यात आली आहे.
इच्छुकांना १ ऑक्टोबर २०१९ पर्यंत www.licind.in/careers या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या परीक्षेसाठी संपूर्ण देशात परीक्षा केंद्रे असून, महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, पणजी आदी ठिकाणी परीक्षा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
मी आताच मुख्यमंत्री आहे… मला उभा राहून काय करायचंय; इंदुरीकर महाराजांची तुफान फटकेबाजी https://t.co/rmOn1H6VI1 @BJP4Maharashtra
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
“जायचंय तर जा…. पण पाया पडण्याइतका स्वाभिमान गहान ठेऊ नका” https://t.co/hOBCcaBiLJ @PawarSpeaks
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019
“सर्वोच्च न्यायालयामुळे देशात आर्थिक मंदी आली”- https://t.co/yjmrPAe7wQ #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 18, 2019