मुंबई | देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी ही सातत्यानं नवीन योजना ग्राहकांसाठी घेऊन येत असते. परिणामी या योजनांमध्ये गुंतवणुकीचा फायदा ग्राहकांना होतो.
एलआयसीमार्फत महिलांसाठी काही खास योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. या योजनांद्वारे ग्राहक महिला योग्य ती रक्कम गुंतवून मोठा फायदा मिळवू शकतात.
आधार कार्ड आज प्रत्येक भारतीयाची ओळख बनली आहे. आधारकार्ड हे प्रत्येक योजनेसाठी महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य मानण्यात येतं. परिणामी सध्या आधारकार्ड असणं गरजेचं आहे.
महिलांसाठी एलआयसीनं एक महत्त्वाची आणि खास योजना आणली आहे. आधारशिला हे या योजनेचं नाव आहे. ही योजना फक्त आधारकार्ड असणाऱ्या महिलांसाठीच असणार आहे.
आधार शिला या योजनेमध्ये बचत करण्यासोबत महिलेला चांगला फायदा देखील मिळत आहे. एखाद्या महिलेनं या योजनेमध्ये दररोज 29 रूपये गुंतवले तर तिला मॅच्युरिटीनंतर तब्बल 4 लाख रूपये मिळतील.
8 ते 55 वयोगटातील कोणतीही महिला ही पाॅलिसी खरेदी करू शकते. ही पाॅलिसी 10 वर्षांसाठी खरेदी केली जावू शकते. कमाल मर्यादा ही 20 वर्षांची आहे. पण मॅच्युरिटीवेळी महिलेचं वय हे 70 वर्षांपेक्षा अधिक नसावे.
या योजनेअंतर्गत 75 हजारांपासून 30 लाखांपर्यंत विमा मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा विमा अपघातावेळी मिळणार आहे. 20 वर्षीय महिला असेल आणि 20 वर्षांचा विमा उतरवला असले तर पहिल्या वर्षी 10 हजार 868 रूपये भरावे लागतील.
या योजनेत वार्षिक, मासिक, त्रैमासिक, सहामासिक हप्ता भरण्याची तरतूद असेल. ग्राहक आपल्या सोईनुसार हप्ता निवडू शकतात. वार्षिक हप्ता भरण्याचा पर्याय निवडला तर मुदतीनंतर 15 दिवसांमध्ये हप्ता भरण्याची सुट आहे.
दोन वर्ष प्रिमियम भरल्यास ग्राहक कधीही पाॅलिसी सरेंडर करू शकतात. परिणामी अनेक अर्थांनी ही पाॅलिसी सध्या महिलांच्या पसंतीस उतरत आहे. यामध्ये गुंतवणूक वाढत आहे.
दरम्यान, एलआयसीच्या प्रत्येक योजनेमध्ये असते तशीच सुरक्षितता या योजनेमध्ये देखील आहे. अगदी छोट्या गुंतवणुकीपासून मोठा फायदा मिळू शकतो.
महत्वाच्या बातम्या –
5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग
श्रेयवादाची लढाई सुरू! राज ठाकरेंचा ‘तो’ जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ; ‘या’ प्रकरणात अंजली दमानिया पुन्हा आक्रमक
भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना