Top news मनोरंजन

48 चा झाला बड्डे बाॅय ऋतिक, जाणून घ्या पिळदार शरीराचं सिक्रेट

hritik roshan 2 e1641826415946
Photo Credit- instagram/hrithikroshan

मुंबई | आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून ऋतिक रोशनला (Hrithik Roshan Birthday) ओळखलं जातं. आज त्याचा वाढदिवस आहे.

बाॅलिवूड कलाकारांच्या फिटनेसविषयी सर्वांना कमालीची उत्सुकता असते. ऋतिक रोशन हा तर बाॅलिवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे.

ऋतिकला फिटनेस आयकाॅन म्हणून देखील ओळखलं जातं. ऋतिक वयाच्या 48 वर्षाचा असताना देखील इतका फिट कसा रहातो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

ऋतिक रोशनच्या फिटनेसविषयी त्याच्यासोबत कायम फिटनेस कोच म्हणून काम करणारे प्रसाद नंद कुमार शिर्के यांनी माहिती दिली आहे.

ऋतिक रोशनचा चित्रपट सुपर 30 काही महिन्यांपूर्वी प्रसिद्ध झाला होता. त्यातही ह्रतिकचा फिटनेस लेवल प्रचंड चांगला होता. परिणामी प्रेक्षकांना तो आवडला होता.

ह्रतिक रोशन आपल्या फिटनेसवर फार मेहनत घेतो. तो जेव्हा व्यायाम करत असतो तेव्हा प्रत्येक लहानातील लहान गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

व्यायामातील नियमितता आणि आहारावरील नियंत्रण ऋतिकला फिट ठेवत आहे. ऋतिक कुठं बाहेर जात असले तर त्याचा स्वंयपाकी त्याच्यासोबत जातो आणि त्याच्या तब्येतीसाठी पुरक आहार बनवतो.

ऋतिकला पार्टी आणि मद्याची सवय नाही. त्याला पार्टी करायला आवडत नाही आणि पार्टीतील काहीही खाण्यापासून ऋतिक लांब राहातो, असंही शिर्के म्हणाले आहेत.

ऋतिक दररोज जवळपास सकाळी 4 तास व्यायाम करतो. त्याचं आपल्या आहारावर पुर्ण नियंत्रण आहे. तो आहारात मटन आणि चिकनचा समावेश संतुलित प्रमाणात करतो.

दरम्यान, ऋतिक रोशनसारखी शरीरयष्टी बनवण्याचं स्वप्न अनेकजण पहात असतात. परिणामी त्याच्या फिटनेस टिप्स फाॅलो करण्याचं काम केलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या 

कपिल शर्माची नरेंद्र मोदींच्या अंदाजात काॅमेडी म्हणाला, “मित्रो आज रात्री…”

 राहुल गांधींनी उलटच केलं! पक्षातील ‘ही’ परंपरा मोडण्यासाठी घेतला मोठा निर्णय

 सर्वांची झोप उडवणारी बातमी समोर; ओमिक्रॉननंतर सापडला डेल्टाक्रॉन व्हायरस

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय  

एलआयसीची जबरदस्त योजना; फक्त 260 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 20 लाख