मुंबई | गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचबरोबर ऑमिक्राॅन (Omicron) रूग्णसंख्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसतंय.
अशातच आता वाढत्या थंडीमुळे अनेकजण आजारी पडत असल्याचं दिसतंय. त्यामुळे योग्य आहार घेणं गरजेचं आहे. ओमिक्राॅनपासून बचाव करण्यासाठी अनेक गोष्टी करायला तज्ज्ञांनी सांगितल्या आहेत.
अशातच ओमिक्राॅनपासून वाचण्यासाठी आपली इम्युनिटी स्टाॅंग करण्याची गरज आहे. यासाठी आपल्या आहारात काही खास पदार्थांचा समावेश करण्याची गरज आहे.
या महामारीच्या काळात फक्त घरी शिजवलेलं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. कारण घरी शिजवलेलं अन्न अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक असतं, असं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.
एकाच वेळी जास्त अन्न खाण्याऐवजी थोड्या थोड्या वेळाने खा. हे निरोगी राहण्यास खूप मदत करेल, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे.
प्रोसेस्ड फूडमध्ये भरपूर मीठ असते, जर तुम्ही ते खात असाल तर त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रौढांनी एका दिवसात खर्च केलेल्या एकूण एनर्जीपेक्षा 5% पेक्षा कमी साखर (सुमारे 6 चमचे) वापरली पाहिजे, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
दरम्यान, दारू पिऊ नये तसेच पुरेश्या प्रमाणात पाणी पिणं देखील गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे ऑमिक्राॅनच्या संकटात जास्त प्रमाणात आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल.
महत्वाच्या बातम्या –
“…तर मी आमदारकीचा राजीनामा देईल”; प्रताप सरनाईक यांचं रोखठोक वक्तव्य
राजकीय भाष्य नडलं! ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून अभिनेते किरण माने यांना बाहेरचा रस्ता
वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय
महिलांसाठी LIC ची जबरदस्त योजना; रोज 29 रूपये गुंतवा अन् मिळवा इतके लाख
5 वर्षांची चिमुकली रिपोर्टर पाहिलीत का?; पाहा हफिजाची रिपोर्टिंग