हिवाळ्यात मुलांना ‘हे’ 10 पदार्थ खायला द्या, प्रतिकारशक्ती मजबूत होईल अन् होईल फायदेच फायदे

मुंबई | सध्या कोरोनाच्या महामारीमुळे सर्वांच्या आयुष्यावर परिणाम होत आहे. तर हिवाळ्यात थंडीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे.

हिवाळ्यात लहान मुलांची खूप काळजी घेणं आवश्यक असतं. वाढत्या थंडीत फक्त उबदार कपडे घालणं पुरेसं नाही तर जेवणाकडेही तितकंच लक्ष देणं देखील गरजेचं आहे.

ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकरी हिवाळ्यात खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. मुलांना ज्वारीच्या आणि बाजरीच्या भाकऱ्या डाळ, तूप किंवा गुळासोबत देता येतील.

आवळा व्हिटॅमिन सीने भरपूर आणि खूप पौष्टिक आहे. चवीनुसार त्यात थोडं मीठ आणि हळद घातलं तर मुलांना ते आवडू शकतं. पालेभाज्या खाणं आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे.

ताजी पालक, मेथी, कांदा यांसारख्या ताज्या हिरव्या भाज्या खायला द्या. रताळे भरपूर पोषक असतात तसेच खायला अतिशय चवदार असतात. तुम्ही ते भाजून त्यावर चाट मसाला लावूनही मुलांना देऊ शकता.

हिवाळ्यात कोरडे फळे शरीराला उबदार ठेवण्याचं काम करतात. मुलाला काजू, बदाम, शेंगदाणे आणि अक्रोड खायला द्या. चव वाढवण्यासाठी तुम्ही हलके भाजलेले देखील देऊ शकता.

हिवाळ्यात, हळदीचे एक ग्लास दूध पिण्यास द्या. ते शरीरात उबदारपणा आणतं आणि तापला दूर ठेवतं. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध उपयोगीचं ठरतं.

हिवाळ्यात गुळाचा वापर वाढवावा. आल्याबरोबर गूळ खाल्ल्याने सर्दी-खोकल्यामध्ये खूप आराम मिळतो. मुलांना दररोज एक उकडलेलं अंडे खायला द्या. शरीराला उबदार ठेवण्यासोबतच ऊर्जा आणि पोषक तत्त्वेही मिळतात.

दरम्यान, गाजराची गोड चव जवळजवळ प्रत्येक लहान मुलाला आवडतं. तुम्ही ते बाळाला गाजराची खीर, भाजी किंवा कोशिंबिरीच्या स्वरूपातही देऊ शकता.

महत्त्वाच्या बातम्या – 

सानिया मिर्झाची निवृत्तीची घोषणा; ‘या’ कारणामुळे सोडणार टेनिसचं कोर्ट

अखेर डुग्गू सापडला! बेपत्ता स्वर्णव सापडल्यानं आई-वडिल भावूक

रावसाहेब दानवेंना जोर का झटका; सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं मारली बाजी 

नारायण राणेंना शिवसेनेचा ‘दे धक्का’, शेवटच्या क्षणी एका आकड्याने… 

ज्युनिअर आर. आर. पाटलांचा धमाका, एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना ‘बाप’ दाखवला!